Swarget Rape Case : आरोपी दत्ता गाडे याच्या अडचणीत आणखी वाढ, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Swarget Rape Case More Trouble for Accused Datta Gade : स्वारगेट अत्याचार प्रकरणी सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
Pune Bus Rape Case accused datta Gade
Pune Bus Rape Case accused datta Gade Sarkarnama
Published on
Updated on

Swarget Rape Case News : स्वारगेट अत्याचार प्रकरणी दत्तात्रेय गाडेची कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज पुणे सत्र न्यायलायत हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलचा शोध घेत असल्याची माहिती दिली. न्यायालयाने आरोपी दत्तात्रय गाडे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दत्तात्रय गाडेवर तीन कलमांची वाढ करत त्याच्या अडचणी वाढवल्या आहेत.

पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने अत्याचार करणे, अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ दत्तात्रेय गाडेवर करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2), 115 (2) आणि 127(2) या कलमांची वाढ करण्यात आली असून.पुणे पोलिसांनी आरोपी आणि पीडित तरुणीचे घटनेच्यावेळी परिधान केलेले कपडे जप्त करून क्राइम लॅबकडे पाठवले आहेत.

Pune Bus Rape Case accused datta Gade
contract workers Maharashtra : कंत्राटी कामगारांना दिलासा! महायुती सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

दरम्यान, न्यायालात आरोपीचे वकीलाने पीडित आणि आरोपी दत्तात्रय गाडे यांच्यामध्ये पैशांची देवाण घेवाण झाली नसल्याचे कबुल केले. आरोपीने जे सांगितले होते त्यानुसार आपण तो दावा केला होता. मात्र, हा दावा खोटा असल्याची कबुली आरोपीच्या वकिलाने दिली आहे.

पीडितेची मागणी अमान्य?

स्वारगेट अत्याचार प्रकरणी सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, अजय मिसर यांच्या नावाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आता पीडित तरुणीकडून सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांना नियुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, अधीच मिसर यांचा प्रस्ताव असल्याने पीडितीचे मागणी मान्य होणार? या विषयी चर्चा सुरू आहेत.

Pune Bus Rape Case accused datta Gade
IAS Officer Namami Bansal: भांडी विक्रेत्याच्या मुलीची 'आयएएस'पदापर्यंतची 'फिनिक्स' भरारी...!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com