Dhananjay Mahadik : ज्यांची जमीन जाणार नाही ते पुढारपण करतायेत; खासदार महाडिकांनी पाटलांना सुनावले

Political News : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली.
Dhananjay Mahadik on Satej Patil
Dhananjay Mahadik on Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : महाराष्ट्राची आण बान आणि शान वाढवणारा शक्तिपीठ महामार्ग आहे. कोल्हापूरचा विकास होऊ नये, अशी भूमिका असलेले काहीजण विरोध करत आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टीका करत, हा शक्तिपीठ महामार्गात माझीही सर्वाधिक जमीन जात आहे. मी बाधित शेतकरी म्हणून समर्थन देत आहे. हा मार्ग झाल्यावर कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलणार आहे. या मार्गामुळे जमिनीच्या किमती वाढणार आहेत, अर्थचक्र वाढणार आहे. हॉटेल, थिएटर केले म्हणजे प्रगती होत नाही. पण ज्यांची जमीन या महामार्गात जाणार नाही, ते पुढारपण करत असल्याचा टोला राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला. ते कोल्हापुरात आयोजित शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ आयोजीत मेळाव्यात बोलत होते.

अमेरिकेमध्ये 50 राज्यांना जोडणारा 10 पदरी रस्ता करण्यात आला. त्यामुळे अमेरिकेची प्रगती झाली. विकास व्हायचा असेल तर दळणवळण गरजेचे आहे. रेल्वे, पुणे-बंगलोर हायवे आणि विमानाची सेवा कोल्हापूरला आहे. अमेरिकेप्रमाणे भारताची प्रगती सुरू आहे. देशभरात मोदींच्या नेतृत्वाखाली इन्फ्रास्ट्रक्चरचे काम सुरू आहे.

Dhananjay Mahadik on Satej Patil
Eknath Shinde : सभागृह गाजवणाऱ्या ठाकरेंच्या 'या' फायरब्रँड नेत्याला एकनाथ शिंदेंनी दिली खुली ऑफर

जगात सगळ्यात मोठे जे आहे ते आपल्याकडे असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गालाही जाणीवपूर्वक विरोध झाला. पण त्यांना चांगला दर दिला आणि तो मार्ग झाला. राम मंदिर बांधत असतानाही विरोध झाला. पैसे कोठून आणणार म्हणून इंडिया आघाडीने अहवेलना केली असल्याचा आरोप महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला.

Dhananjay Mahadik on Satej Patil
Eknath Shinde : फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा जोरदार धक्का; 'या' महत्त्वाच्या पदावरुन जवळच्या नेत्याला हटवले

अयोध्येचा कायापालट झाला, हॉटेल वाढली, व्यवसाय वाढला. प्रयागराजमधला महाकुंभ यशस्वी होऊ नये म्हणून जगातून प्रयत्न झाले. परमेश्वर आहे. त्यामुळे यशस्वी झाला. 15 हजार कोटी पाण्यात घातले म्हणून आरोप झाला. पण साडेचार लाख कोटी उत्पन्न झाले. 45 दिवसांत अनेकांनी कोट्यवधी रुपये कमावले. चहावल्याने सहा कोटी कमवले असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.

Dhananjay Mahadik on Satej Patil
Mahayuti Government: महायुती सरकारनं घेतला मीडियाचा मोठा धसका!10 कोटींचा खर्च करुन घेतला 'हा'निर्णय

जगभरातून लोक अंबाबाईला येत आहेत. त्यामुळे या रस्त्यामुळे कोल्हापूरचीही प्रगती होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचा उच्चांकी मोबदला देणार असे सांगितले आहे. सोलापूरची लोक आमच्या जमिनीच्या बाजूने रस्ता घ्या, म्हणत आहेत. बाजूच्या जमिनीला सोन्याचे दिवस येतील, अशी शेतकऱ्यांची भावना आहे, असेही महाडिक म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Dhananjay Mahadik on Satej Patil
Opposition leader : विरोधी पक्षनेतेपदासाठी आंध्र प्रदेशाप्रमाणेच राज्यातील परिस्थिती; चार दशकापूर्वीचा इतिहास काय सांगतो?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com