राज्‍यात ठाकरे सरकार असले तरी, पुणे जिल्ह्यात पवार सरकार : आढळरावांनी व्यक्त केली खदखद!

बारामतीला जे करायचय ते करा, पण जुन्नरचे प्रकल्प पळवू नका : शिवाजीराव आढळराव पाटील
Shivajirao Adhalrao Patil- Sharad Sonawane
Shivajirao Adhalrao Patil- Sharad SonawaneSarkarnama
Published on
Updated on

पुणे : बिबट सफारी प्रकल्पाची मूळ संकल्पना कोणी मांडली, त्यासाठी राज्य सरकारकडे खस्ता कोणी खाल्ल्या, याची इत्यंभूत माहिती जुन्नर तालुक्यातील जनतेला आहे. जुन्नरचे तत्कालीन आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांनी २०१४ ते २०१९ या कार्यकाळात राज्यातल एकमेव पर्यटन तालुका म्हणून जुन्नरला बहुमान प्राप्त करून दिला. बिबट सफारी हा तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रकल्प आणण्यासाठी तत्कालीन वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्यांनी केलेले प्रयत्न मी स्वतः पाहिलेले व अनुभवलेले आहेत. यामुळे सोनवणेंच्या उपोषणाला माझा आणि शिवसेनेचा खंबीर पाठिंबा असल्याचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी सांगितले. (Thackeray government in the state, but Pawar's government in Pune district : Adhalrao Patil)

आढळराव पाटील यांनी बुधवारी (ता. २३ मार्च) सोनवणे यांची उपोषणस्थळी भेट घेऊन, तब्बेतीची विचारपूस करत, उपोषणाला पाठिंबा दिला. आढळराव म्हणाले की, ‘‘जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी, शिवसृष्टी बारामतीला गेली तरी इथल्या आमदार-खासदारांना याचं काहीही देणे-घेणे दिसत नाही. आपण सत्तेतील आमदार-खासदार आहात. मग, तालुक्यातील प्रकल्प बाहेर जात असताना तुम्ही नक्की करताय तरी काय? केवळ शरद सोनवणे हे विरोधात असल्याने त्यांनी प्रकल्प आणला; म्हणून तो होऊ द्यायचा नाही, ही शूद्र भावना आहे. सत्तेतला जिल्हाप्रमुख असला तरीसुद्धा त्यांना उपोषण करणं भाग पडत आहे. ही वस्तुस्थिती असून राज्यात जरी महाविकास आघाडी असली तरी संपूर्ण पुणे जिल्ह्यात पवार सरकार आहे, इथं शिवसेनेकडून काम होऊच द्यायची नाही, अशा स्वरूपाची वागणूक राष्ट्रवादीकडून सुरू आहे.

Shivajirao Adhalrao Patil- Sharad Sonawane
जानकरसाहेब, दुसरे एक मित्र जवळ आल्याने सध्या तुमच्याकडे दुर्लक्ष : अजितदादांनी घेतली फिरकी

शिवसेनेच्या खेडच्या सभापतींना विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून कारागृहामध्ये टाकण्यात आले आहे. इतकं वाईट स्वरूपाचं राजकारण येथे सुरू आहे. त्यामुळे आम्हा शिवसैनिकांना सन्मानानं जगू द्या, एवढीच आमची अपेक्षा आहे. बारामतीकरांकडून सत्तेचा अघोरी वापर सुरू आहे, त्यामुळे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना आंदोलने करणे भाग पडत आहे, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.

Shivajirao Adhalrao Patil- Sharad Sonawane
अजित पवारांनी सांगितले, सोलापूर जिल्हा बॅंकेची निवडणूक कधी होणार?

जुन्नरचे प्रकल्प बारामतीला पळवू नका : आढळराव

बारामतीला तुम्हाला जे जे काही करायचे ते करा, पण नैसर्गिकरित्या या भागात असलेल्या गोष्टी तिकडे पळवायचा प्रयत्न करू नका. हे असे उद्योग राष्ट्रवादीने थांबवून सलोख्याने येथील शिवसैनिकांना विश्वासात घेऊन कामे करावीत, असे आवाहन करीत शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार शरद सोनवणे यांच्या उपोषणाला माजी खासदार आढळराव पाटील यांनी जाहीर व खंबीर पाठिंबा व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com