PMC Election 2026 : पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेने दुप्‍पट जागांवर दाखल केले उमेदवारी अर्ज, माघार न घेतल्यास आघाडीत बिघाडी होणार?

Pune MVA Seat Sharing : ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या आघाडीत ‘शिवसेनेला ६५ जागा मिळाल्‍या आहेत. यामधून त्यांनी मनसेला २१ जागा सोडल्‍या आहेत. त्‍यामुळे ठाकरेंच्‍या शिवसेनेला ४४ मिळाल्या आहेत. मात्र, मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्‍याचा शेवटचा दिवस असताना पक्षाने प्रत्‍यक्षात ८० ‘एबी’ फॉर्मचे वाटप केलं आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 31 Dec : महाविकास आघाडीतील जागावाटपात ठाकरेंच्‍या शिवसेनेला ६० जाग मिळाल्‍या आहेत. तर या ६० जागांपैकी २१ जागा मनसेला दिल्‍या आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडे ४४ जागा असताना पक्षाने मात्र ८० जणांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप केले आहे

त्यामुळे जागावाटपात आलेल्या जागांपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेच्या दुप्‍पट उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्‍यान पक्षाकडून शहरप्रमुख संजय मोरे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या आघाडीत ‘शिवसेनेला ६५ जागा मिळाल्‍या आहेत. यामधून त्यांनी मनसेला २१ जागा सोडल्‍या आहेत. त्‍यामुळे ठाकरेंच्‍या शिवसेनेला ४४ मिळाल्या आहेत. मात्र, मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्‍याचा शेवटचा दिवस असताना पक्षाने प्रत्‍यक्षात ८० ‘एबी’ फॉर्मचे वाटप केलं आहे.

Shivsena UBT News
Kalyan Dombivli Election : श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रवींद्र चव्हाणांची जादू : मतदानापूर्वीच दोघांना केलं नगरसेवक; CM फडणवीसांकडून अभिनंदन

पक्षाकडून शहराध्‍यक्ष मोरे यांच्‍यासह माजी नगरसेवक वसंत मोरे, त्‍यांचे चिरंजीव रूपेश मोरे यांनी वेगवेगळ्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्‍याचबरोबर माजी नगरसेवक योगेश मोकाटे, पुणे बार असोसिएशनचे सतीश मुळीक, नुकतेच पक्षात दाखल झालेले पप्‍पू ओगले यांची नावे आहेत.

Shivsena UBT News
PMC Election : पवार एकत्र आले पण शेवटच्या दिवशी नाराजीनाट्य रंगले! दोन्ही राष्ट्रवादीत एबी फॉर्मवरून गोंधळ!

तसेच, शिंदेसेनेतून पक्षात आलेल्‍या कल्‍पना थोरवे यांनाही पुन्‍हा संधी देण्‍यात आली आहे. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत पक्षाकडून आढावा घेण्‍याचे काम सुरू होते. अधिक ठिकाणी उमेदवारी देण्‍यात आली असली तरी त्‍यांनी भरलेल्‍या उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येत आहे. जागावाटप झाले असले तरी आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com