पुणेकरांचे कोट्यवधी रूपये खर्च झालेल्या 'बीआरटी मार्ग' बंद होण्याच्या मार्गावर!

PUNE News : पालिकेकडून आजपर्यंत करोडो रूपयांचा निधी खर्च करण्यात आला.
BRT Pune
BRT PuneSarkarnama
Published on
Updated on

पुणे : वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक अधिकाधिक सक्षम यावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून पुणे महानगर पालिकेने बीआरटी योजना राबवण्यास सुरूवात केली. यासाठी पालिकेकडून आजपर्यंत करोडो रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. योजना पूर्णत्वास गेली नाही, मात्र काही प्रमाणात, काही मार्गांवर बीआरटी रूट कार्यान्वित आहे. मात्र आता पोलिस आयुक्तांच्या एका पत्राने बीआरटीबाबत पुन्हा एकादा चर्चा सुरू झाली आहे. बीआरटी मार्गच बंद करण्यात यावे, अशी मागणी पोलिस आयुक्तांनी केली.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरातील बीआरटी मार्ग बंद करा, अशा मागणीचं पत्र पोलीस आयुक्त यांनी महापालिका आयुक्तांना लिहले आहे. यापूर्वीच शहराची वाहतूक समस्या अधिरच बिकट बनली आहे. यासाठी शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालावी, पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमन व्हावे, अशी मागणी महापालिकेने पोलिसांकडे केली होती.

BRT Pune
"मित्र-नातेवाईकांना कॉन्ट्रक्ट दिल्यामुळेच मोरबी पूल दुर्घटना घडली नाही ना?"

आता पोलीस आयुक्तांनीच थेट पुणे महापालिकेला पत्र लिहले आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करायचे असेल तर सर्व बीआरटी मार्ग बंद करा, तसेच अनावश्यक सायकल ट्रॅक काढून टाकावे, असे पत्रच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठवले आहे. नगर रस्ता, सातारा रस्ता तसेच सोलापूर रस्त्यावरील बीआरटी बंद करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे. यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com