

Pune News: राज्यात आता महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात आलेला विकास निधी हा सरकारचा असून, वैयक्तिक कुणाच्या मालकीचा नाही, असा टोला भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी नाव न घेता दत्तात्रय भरणे यांना लगावला.
इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये विकास निधी, पाण्याच्या प्रश्नावरून कायम श्रेयवाद पाहायला मिळतो. या श्रेयवादावरून दोघांमध्ये टीकाटिप्पणीचे राजकारण सुरू असते. आता हर्षवर्धन पाटील यांनी कुरवली (ता. इंदापूर) येथे पत्रकारांशी बोलताना नाव न घेता भरणेंवर टीका केली.
सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षही सरकारमध्ये सहभागी आहे. इंदापूर तालुक्यामध्ये आलेला विकास निधी सरकारचा असल्याचे स्पष्ट करत वैयक्तिक निधी नाही, असं ते म्हणाले. तसेच केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे. राज्यात भाजपचे सर्वाधित आमदार आहेत, असे सांगत आलेला निधी हा सरकारचा आहे, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, सध्या नीरा नदीमधून पावसाचे पाणी वाहत आहे. तालुक्यात चालू वर्षी कमी पाऊस झाला. नीरा नदीवरती सर्व बंधाऱ्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यासाठी पाटबंधारे विभागाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या आहेत.
बंधाऱ्यातून पाण्याची गळती होणार नाही, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. बंधारे पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यास जानेवारी महिन्यापर्यंत बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होईल, तसेच कालव्याच्या पाण्याचेही योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.