Loksabha Election 2024 : पुण्यासाठी 6 हजार 54, तर इतर 11 मतदारसंघासाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट !

Lok Sabha election fourth Phase : चौथ्या टप्प्यातील मतदानास सामोरं जाण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज
Loksabha Election
Loksabha ElectionSarkarnama

Pune Political News : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघातील जाहीर प्रचार आता थांबला आहे. सोमवारी पुणे लोकसभेसह अकरा लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडत आहे. यासाठी आवश्यक ती तयारी निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. यासाठी 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, मावळ, शिरूर लोकसभा मतदार संघासह राज्यातील औरंगाबाद, नंदुरबार, रावेर, जालना, बीड, जळगाव, अहमदनगर आणि शिर्डी या जिल्ह्यांमधील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.

त्यासाठी 29 हजार 284 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट, 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि 23 हजार 284 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Loksabha Election
Ravindra Dhangekar : विदर्भातील काँग्रेसच्या 'या' नेत्याचं रवींद्र धंगेकरांवर विशेष प्रेम!

मतदानाच्या दिवशी मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहेत. मतदान केंद्रावर अचानक मशीन मध्ये काही बिघाड निर्माण झाल्यास काय करायचे याची माहिती देखील कर्मचारी, अधिकारी यांना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेली आहे. ईव्हीएम मध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास मशीनचा राखीव कोटा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मतदान केंद्रांवर रविवारी संपूर्ण सेटअप लावण्यात आला असून त्याची चाचणी देखील घेण्यात आली आहे. सोमवारी सकाळी उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्यासमोर आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात केली जाईल असे जिल्हा निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे शहरात असलेल्या मतदान केंद्रांसाठी 6054 बॅलेट युनिट आणि 2018 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील 2566 मतदान केंद्रांसाठी 7698 बॅलेट युनिट आणि 2566 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट तर शिरूरमधील 2509 मतदान केंद्रांसाठी 7527 बॅलेट युनिट आणि 2509 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

Loksabha Election
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेनंतर पुण्यातील 'आमचं ठरलंय'चा ट्रेंड कोणाला ठरणार फायदेशीर?

याचबरोबर इतर आठ लोकसभा मतदारसंघांपैकी औरंगाबादमधील 2040 मतदान केंद्रांसाठी 6120 बॅलेट युनिट आणि 2040 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, नंदुरबारमधील 2115 मतदान केंद्रांसाठी 2115 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, रावेरमधील 1904 मतदान केंद्रांसाठी 3808 बॅलेट युनिट तर 1904 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, बीडमधील 2355 मतदान केंद्रांसाठी 7065 बॅलेट युनिट आणि 2355 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, जळगावमधील 1982 मतदान केंद्रासाठी 1982 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट देण्यात आले आहेत.

Loksabha Election
Lok Sabha Election 2024: अबब! पुण्यात आचारसंहिता भंगाच्या 'इतक्या' तक्रारी!

अहमदनगरमधील 2026 मतदान केंद्रांसाठी 4052 बॅलेट युनिट आणि 2026 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिर्डीमधील 1708 मतदान केंद्रांसाठी 3416 बॅलेट युनिट आणि 1708 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट तर जालनामधील 2061 मतदान केंद्रांसाठी 4122 बॅलेट युनिट आणि 2061 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे. मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांवर देखील याची जबाबदारी देण्यात आल्याचे निवडणूक प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com