Uday Samant : 'महाविकास आघाडीला मिळालेले यश हे तात्पुरतेच'; उदय सामंतांचा टोला !

Lok Sabha Election 2024 : प्रतापराव जाधव हे चार वेळा खासदार निवडून गेले आहेत. त्यांनी राज्यात देखील मंत्री म्हणून काम पाहिला आहे. तसेच ते तीनदा आमदार देखील राहिले आहेत...
Uday Samant
Uday Samant Sarkarnama

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पदरात मोठे यश पडले आहे. आघाडीतील तीन पक्षांनी मिळून तब्बल 31 जागा जिंकल्या आहेत तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावे लागले आहे. महाविकास आघाडीला मिळालेल्या या विजयाचं विश्लेषण विविध पक्षांकडून वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात येत आहे. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील विजय म्हणजे तात्पुरती सूज असल्याचे सांगितले.

तज्ज्ञांची भाकीत आणि एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरवत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मोठी मुसंडी मारली.महाराष्ट्रातील हा विजय हा फोडाफोडीच्या राजकारणात चपराक असल्याचं महाविकास आघडीचे नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून हा विजय लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून मिळवलेला विजय असल्याचं सांगण्यात येत आहे. यावर आता पुणे दौऱ्यावर असताना उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीच्या बैठकीमध्ये केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटाचे नेते नाराज असल्याबाबत उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, श्रीरंग बारणे यांच्याशी अद्याप माझी कोणतीही चर्चा झालेली नाही. परंतु प्रतापराव जाधव हे चार वेळा खासदार निवडून गेले आहेत. त्यांनी राज्यात देखील मंत्री म्हणून काम पाहिला आहे. तसेच ते तीनदा आमदार देखील राहिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पुत्र तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असताना देखील मागची प्रथा कायम न ठेवता एका सामान्य शिवसैनिकाला शिंदे यांनी न्याय दिला आहे. त्यामुळे हीच खरी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे हे स्पष्ट होतं.

Uday Samant
Uday Samant : शरद पवारसाहेब, युवा नेत्यांना ‘हा’ सल्ला द्या... : उदय सामंत

उदय सामंत पुढे म्हणाले, कालची शिवसेनेची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कुठेही मंत्री पद मिळाले नाही याबाबत नाराजीचा सूर नव्हता. मी पूर्ण वेळ बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये जे सात खासदार निवडून आले आहेत हे यश काही कमी नाही. कारण आमचा स्ट्राईक रेट हा 48 टक्के आहे. काही लोकांनी मुस्लिम (Muslim) आणि दलित बांधवांच्या जीवावरती जी मतं मिळवली आहे. ती त्यांना आलेली सूज आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तशा प्रकारची रणनीती असावी याबाबत शिवसेनेच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं उदय सामंत यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com