Pune, 11 June : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील उद्योगधंदे हे बाहेर जात असल्याचा मोठा मुद्दा विरोधकांनी प्रचारात वापरला. पुण्याजवळील हिंजवडी आयटी पार्क मधील 16 कंपन्या स्थलांतरित झाल्याने स्थानिक तरुणांचा रोजगार गेल्याचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला होता. यावर आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे.
पुणे दौऱ्यावर असताना उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. उदय सामंत म्हणाले, हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi IT Park) मधील ज्या 16 कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत, त्या 16 कंपन्या पुणे जिल्ह्यातच स्थलांतरित झालेल्या आहेत. त्या बाहेर कुठेही गेलेल्या नाहीत. या कंपन्यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे. त्या संदर्भात मी पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये बैठक घेणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गेला आणि इतर उद्योगधंदे केले असा टाहो काही जणांनी फोडला. मात्र दाओस दौऱ्यावरून आल्यानंतर तीन लाख 720 हजार कोटींचे आम्ही ‘एमोयू’ केले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे विरोधकांना माझी विनंती आहे की, इतर गोष्टीवर राजकारण करा मात्र उद्योगधंदवर राजकारण करू नका, असे सामंत यांनी म्हटले आहे.
हिंजवडी आयटी पार्क येथून जाणाऱ्या कंपन्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बैठक घेणार असल्याचं समोर येत आहे. त्याबाबत बोलताना सामंत म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याची मुभा आहे, त्यामुळे शरद पवार यांनी जर बैठक घेतली आणि त्या बैठकीचा फायदा सरकारला होणार असेल तर त्यात काही हरकत नाही.
शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या युवा नेत्यांना उद्योजकांवर आणि उद्योगांवर तोंड टाकणं, हे देशाच्या उद्योग जगतासाठी चांगलं नाही, याबाबतही सल्ला देणे आवश्यक आहे. तसेच, उद्योजकांच्या घराखाली जिलेटिन ठेवणं बंद झाल्यास असले प्रकार भविष्यात घडणार नाहीत, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.