Drug Mafia Lalit Patil News : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून राजकारण तापलं; राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Pune Drug Racket : ड्रग्ज प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण चांगलेच तापले आहे.
Drug Mafia Lalit Patil News
Drug Mafia Lalit Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज तस्करी उघडकीस आल्यानंतर पोलिस खात्यासह रुग्णालय प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत. आता या प्रकरणात दिवसागणिक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

एकीकडे पोलिसांना चकवा देऊन पळून गेलेल्या ललित पाटीलचा भाऊ आणि त्याच्या साथीदाराला पुणे पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून अटक केली आहे. मात्र, या ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड ललित पाटील नेपाळमध्ये पळून गेला असण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणी सरकारकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे.

ड्रग प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण चांगलेच तापले आहे. यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole),आमदार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.

सरकारकडून आता पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्जप्रकरणी सखोल चौकशी करण्याकरिता चार सदस्यांची चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. या समितीचे अध्यक्ष राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक दिलीप म्हैसेकर असणार आहेत.

Drug Mafia Lalit Patil News
Ajit Pawar News : मुंबईसाठी अजितदादांचा मोठा निर्णय; दोन बड्या नेत्यांवर सोपवली 'ही' जबाबदारी

त्यांच्यासोबतच या समितीत सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. हेमंत गोडबोले, मुंबई येथील ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. एकनाथ पवार यांचा समावेश आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला ललित पाटील(Lalit Patil) नेपाळमध्ये पळून गेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुणे पोलिसांनी पाटीलचा फास आवळतानाच भाऊ भूषण पाटील आणि ड्रग्जची डिलिव्हरी करणाऱ्या अभिषेक बलकवडेला उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून अटक केली होती. ललित पाटीलच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथकासह गुन्हे शाखेची दहा पथके तयार केली आहेत.

ड्रगमाफिया ललित पाटील नेपाळमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मेफेड्राेन विक्रीचे रॅकेट चालवत असल्यानं ललित पाटीलचे देशातील आणि देशाबाहेरील अनेक ड्रगमाफियांशी आधीपासूनच संबंध आहेत.

दुबई, थायलंड आणि मलेशिया या देशांत ललित पाटील मेफेड्रोन पाठवत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.त्याचाच आधार घेऊन ललित पाटीलने नेपाळला पळ काढल्याची शक्यता आहे. (Pune Drug Racket)

यापूर्वी मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिक परिसरातील शिंदे गावात पाटीलचा भाऊ भूषण याच्या कारख्यानावर छापा टाकला. त्यात सुमारे 300 कोटींचे मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले होते. या कारवाईनंतर भूषण पाटीलने उत्तर प्रदेश गाठले होते.

गोरखपूर भागात नेपाळ सीमेजवळ तो असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने साथीदारासह त्याला एका लॉजमधून ताब्यात घेतले. हे दोघेही नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Drug Mafia Lalit Patil News
Supreme Court News : शिंदेंसाठी 'वरदान' ठरलेल्या केसचा सुप्रीम कोर्टात होणार पुनर्विचार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com