Pimpri News : वाढदिवसाच्या तडतडणाऱ्या (स्पार्कलिंग) मेणबत्त्या बनविणाऱ्या तळवडे येथील शिवराज एंटरप्रायजेस या अनधिकृत उद्योगात स्फोट होऊन लागलेल्या आगीत १३ महिलांचा बळी गेल्या महिन्यांत ८ तारखेला गेला होता. त्यानंतर अशाच एका मोठ्या अग्निकाडांत उद्योगनगरीत आज पहाटे दोन सख्ख्या भावांचा झोपेत असतानाच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये बर्न हॉस्पिटल आणि बर्न वॉर्डही नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आणि चर्चेत आला आहे. (Two brothers died in fire in Pimpri-Chinchwad)
तळवडेतील आगीतील बर्न वॉर्ड शहरातील चारपैकी एका महापालिका रुग्णालयात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण, गेल्या दीड महिन्यात त्यात काहीच प्रगती न झाल्याने हा वॉर्ड अद्याप कागदावरच आहे. दुसरीकडे, आगीच्या घटना शहरात वाढत चालल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आकुर्डीत चार दिवसांपूर्वी (ता. १९ जानेवारी) अक्षय स्क्रॅप सेंटरमध्ये वायूगळती होऊन लागलेल्या आगीत चौघे भाजले होते. त्यानंतर आज पहाटे वाल्हेकरवाडीत जयमल्हार कॉलनीतील पत्राशेडमधील गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीजमधील या आगीत ललित अर्जुन चौधरी (वय 21) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय 23) या दोघा सख्ख्या भावांचा बळी गेला.
आगीच्या धुरामुळे निर्माण झालेल्या कार्बन डाय-ऑक्साइड तथा कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूने, तसेच ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने झोपेतच बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ही आग आटोक्यात आणताना काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. पत्र्याच्या शेडच्या रांगेतील दोन दुकाने आणि एक मोटार त्यात जळाली.
या शेडमध्ये असलेल्या लाकडाच्या वखारीमुळे ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. पाच बंब आणि चाळीस जवानांनी ती आटोक्यात आणली. तसेच, परिसरातील सर्व नागरिकांना पोलिसांच्या मदतीने सुरक्षित स्थळी हलवले. गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीज आणि विनायक ॲल्युमिनियम प्रोफाइल डोअर हे दोन गाळे या आगीत जळून खाक झाले. अग्निशमन पथके घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिकांनी या दोन्ही शेडचे दरवाजे उघडून आग पाण्याने विझवण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान, तळवडे आगीचा मुद्दा त्यावेळी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत, तर विधान परिषेदत उमा खापरे यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. या भेटीनंतर पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाने शहरात नसलेले बर्न वॉर्ड उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. पण, ते अद्याप साकार झालेले नाही, त्यामुळे शहरात आगीत भाजलेल्या जखमींना अजूनही पुण्यातील ससून रुग्णालयात न्यावे लागत आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.