Solapur Congress : ‘स्थानिक उमेदवार दिला तर पाडापाडी होईल; दक्षिणमधून मोहिते पाटलांना उमेदवारी द्या’

Dhavalsinh Mohite Patil News : दक्षिण सोलापूरमधून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची रमेश हसापुरे यांनी मागणी केल्याने सुशीलकुमार शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे.
Dhavalsinh Mohite Patil
Dhavalsinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर लोकसभेसाठी गोळाबेरीज करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढील अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. दक्षिण सोलापूर मतदारसंघावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच दिसून येत आहे. या मतदारसंघातून विधानसभेला इच्छूक असणारे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे बंधू काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी दक्षिणमधून जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे, त्यामुळे प्रणिती शिंदेंसाठी लोकसभेची गणिते जुळविणाऱ्या शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे. (Congress office bearer's demand to nominate Dhavalsinh Mohite Patil from South Solapur)

रमेश हसापुरे यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीसाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच दक्षिण सोलापूरमध्ये उमेदवारीवरून घमासान सुरू झाले आहे. वास्तविक या मतदारसंघात रमेश हसापुरे यांचे बंधू काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी वर्षभरापासून विधानसभेची तयारी चालवली आहे. मात्र, त्यांना घरातूनच विरोध होत असल्याचे रमेश हसापुरे यांच्या मागणीवरून पुढे आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhavalsinh Mohite Patil
Harshvardhan Patil : प्रत्येक टर्ममध्ये मंत्रिपद... महाराष्ट्रातील एकमेव आमदार : हर्षवर्धन पाटील

काँग्रेसमधून आमदार झालेले आणि सध्या कोणत्याही पक्षात नसलेले माजी आमदार दिलीप माने यांनीही दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. दक्षिणमधील उमेदवारीच्या अटीवर त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये माने यांची दावेदारी असणार आहे. एवढे दिवस अलिप्त असणारे माने आता महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. हसापुरे, माने यांच्यानंतर आता मोहिते पाटील यांचे नाव दक्षिण सोलापूरसाठी चर्चेत आले आहे, त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला अगोदर दक्षिणचा तिढा सोडावा लागणार आहे.

दक्षिण सोलापूरमध्ये अनेक मातब्बर नेते आहेत. मात्र, त्यांनी या पक्षातून त्या पक्षात नुसत्या उड्या मारण्याचे काम केले असून त्यांना उमेदवारी मागण्याचा कोणताही हक्क उरलेला नाही. मतदारसंघातील लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. काहींना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पाडण्याचे काम केले आहे. काही लोक पक्षाचे काम करायचे सोडून नुसत्या तोड्या करण्याचे काम करत आहेत. स्थानिकांना उमेदवारी दिली तर ते एकमेकांना पाडापाडी करण्याचे काम करतात, त्यामुळे स्थानिक नेत्यांना उमेदवारी न देता जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी आहे, असे रमेश हसापुरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Dhavalsinh Mohite Patil
Indapur Politics : भरणेंसाठी धोक्याची घंटा... हर्षवर्धन पाटील-प्रवीण माने एकाच व्यासपीठावर...

माजी आमदार (दिलीप माने यांचे नाव न घेता) मागील वेळी काँग्रेसमधून शिवसेनेत गेले. त्यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दक्षिणच्या जनतेचा विश्वासघात केला, त्यामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेशाची भाषा करू नये. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नेत्यांचा त्यांच्या आग्रह असेल तर तो त्यांचा बालीशपणा आहे, असा प्रहारही हसापुरे यांनी काँग्रेस नेत्यांवर केला आहे.

दरम्यान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहिते पाटील यांचा पारंपारिक माळशिरस मतदारसंघ राखीव आहे. शेजारचा माढा मतदारसंघही राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे धवलसिंहांनीही सुरवातीला दक्षिणमधून निवडणूक लढविण्याबाबत भाष्य केले होते. मात्र, तेही सध्या अलिप्त दिसत आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते सहकार्य करीत नसल्याची खंत त्यांचे समर्थक बोलून दाखवत आहेत. त्यानंतरही दक्षिण सोलापूरमध्ये त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जात आहे.

Dhavalsinh Mohite Patil
Abhijeet Patil : पवारांच्या दौऱ्याचे स्टेअरिंग अभिजित पाटलांच्या हाती; पंढरपूर ते सोलापूर प्रवासाची रंजक कहाणी...

मतदारसंघ काँग्रेस की शिवसेनेला सुटणार?

शिवसेना-भाजप युतीमध्ये दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा शिवसेनेकडे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत तो काँग्रेसकडे होता. आता काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीत एकत्र आले आहेत. त्यामुळे दक्षिण सोलापूर मतदारसंघ हा काँग्रेस लढवणार की शिवसेनेच्या वाट्याला कायम राहणार याकडे इच्छुकांचे लक्ष असणार आहे.

Dhavalsinh Mohite Patil
Dharashiva Loksabha : सावंतांची आता थेट लोकसभेच्या आखाड्यात उडी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com