Corporation Election 2026 : आंबेगावच्या दोन कन्या अन्‌ एका सुपुत्राने नवी मुंबई, पुण्यात फडकावली विजयी पताका

Ambegaon News : महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निकालात भाजपने बहुसंख्य महापालिकांवर सत्ता मिळवली. मुंबई, नवी मुंबई, पुण्यात भाजपचे वर्चस्व दिसून आले असून आंबेगावच्या तिघांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला.
Bhausaheb Bhapkar-Aishwarya Pathare-Adv. Swapna Gawde
Bhausaheb Bhapkar-Aishwarya Pathare-Adv. Swapna GawdeSarkarnama
Published on
Updated on

Pargaon, 17 January : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी (ता. 16 जानेवारी) जाहीर झाला. त्यातील बहुतांश महापालिकेत भाजपने निर्विवाद सत्ता मिळविली आहे. संपूर्ण देशात महत्वपूर्ण असलेल्या मुंबईसह नवी मुंबईवर भाजपने वर्चस्व राखले आहे. नवी मुंबई आणि पुणे महापालिका निवडणुकीत आंबेगावमधील दोन कन्या आणि एका सुपुत्राने विजयी पताका फडकावली आहे. विशेष म्हणजे हे तिघेही भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील वळती गावचे सुपुत्र भाऊसाहेब भापकर आणि गावडेवाडीच्या कन्या ॲड. स्वप्ना अशोक गावडे यांनी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत विजय मिळविला आहे, तर वळती गावच्याच ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांची पुणे महापालिकेच्या नगरसेवकपदी निवड झाली आहे.

राज्यातील महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून शुक्रवारी निकालही जाहीर झाले आहेत. आंबेगाव तालुक्यातील वळती गावचे सुपुत्र भाऊसाहेब भापकर हे नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपच्या (BJP) तिकिटावर निवडून आले आहेत. भापकर यांनी वळती गावचे सरपंच म्हणूनही काम पाहिलेले आहे, त्यांच्या पत्नी मंगल भापकर या वळती गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत.

गावडेवाडीच्या कन्या ॲड. स्वप्ना अशोक गावडे या नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. ॲड. स्वप्ना गावडे या माजी नगरसेविका असून त्यांनी महिला बाल कल्याण समितीच्या सभापती म्हणून काम पाहिलेले आहे. त्यांचे वडील अशोक अंकुश गावडे यांनी नवी मुंबईचे उपमहापौर म्हणून काम पाहिलेले आहे.

Bhausaheb Bhapkar-Aishwarya Pathare-Adv. Swapna Gawde
Nashik MNS : एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे इंजिन फक्त एका जागेवर पडले बंद

मंचर येथील सेवानिवृत्त गटविकास अधिकारी व तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अतुल चिखले यांची कन्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सुनबाई ऐश्वर्या सुरेंद्र पठारे या पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहे.

Bhausaheb Bhapkar-Aishwarya Pathare-Adv. Swapna Gawde
Chhagan Bhujbal Politics : छगन भुजबळांची अनुपस्थिती; नेतृत्वहीन अजित पवारांची राष्ट्रवादी ठरली प्रभावहीन!

विशेष म्हणजे त्यांचे पती सुरेंद्र पठारे हे प्रभाग क्रमांक चारमधून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे दोघे पती-पत्नी भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com