Shivajirao Adhalrao Patil : आंबेगाव-शिरूरमध्ये आढळरावांना ‘मानाचे पान’; पण मोहिते, बेनके, तुपे स्वीकारेनात!

Shirur Loksabha Politic's :अजित पवारांनी नारायणगाव पोलिस ठाण्याच्या उद्‌घाटन कार्यक्रमात आढळराव पाटील यांना मानाचे स्थान देत, भाषणाची सुरूवात त्यांच्या नावाच्या उल्लेखाने केली. मात्र जुन्नर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्या विविध माहिती पत्रकांमध्ये आढळरावांचा समावेश नसल्याची चर्चा आहे.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 30 May : राजकीय नशिब अजमावण्यासाठी शिरूर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, राष्ट्रवादीने अद्याप आढळरावांना स्वीकारले नसल्याचे आणि आढळराव पाटील राष्ट्रवादीत रमले नसल्याचे चित्र आहे. शिरूर हवेलीतून विधानसभेसाठी हेरलेले माऊली कटके आणि आंबेगावातून दिलीप वळसे पाटील यांनी विजश्री खेचून आणण्यात महत्वाची भूमिका निभावलेल्या आढळरावांना मानाचे पान आहे. मात्र, खेड, जुन्नर, हडपसर मतदारसंघात दुरावा कायम असून, बेनके, मोहिते, तुपेंकडून आढळरावांना सन्मान मिळत नसल्याचे विविध कार्यक्रमांमधून दिसून येते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा नुकताच जुन्नर तालुक्यात दौरा झाला. या दौऱ्यामधील विविध विकासकामांच्या माहितीपत्रकात आढळराव पाटील यांचा उल्लेख आणि छायाचित्र नव्हते. याप्रकरणी आढळराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. मात्र, अजित पवारांनी नारायणगाव पोलिस ठाण्याच्या उद्‌घाटन कार्यक्रमात आढळराव पाटील यांना मानाचे स्थान देत, भाषणाची सुरूवात आढळराव पाटील यांच्या नावाच्या उल्लेखाने केली. मात्र जुन्नर तालुका राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्या विविध माहिती पत्रकांमध्ये आढळरावांचा समावेश नसल्याची चर्चा आहे.

खेड राष्ट्रवादीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना डावलण्यात येत असल्याचे चित्र आहे. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचा वाढदिवस नुकताच झाला. वाढदिवसाच्या जाहिरातीतही आढळराव यांचे नाव आणि फोटो नव्हता, त्यामुळे आढळरावांनीही मोहिते यांना शुभेच्छा दिल्या नसल्याचे समजते. त्यामुळे आढळराव आणि मोहिते यांची एकमेकांवरील नाराजी कायम असल्याचे दिसून येते.

दुसरीकडे खेडचे शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे आणि आढळराव यांचा वाढता सलोखा चर्चेचा विषय आहे. बाबाजी काळे यांनी आढळराव यांच्या वाढदिवसाला लांडेवाडी येथे जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. आढळराव आणि काळे यांच्यातील भेट ही अनेकांच्या भूवया उंचावणारी ठरली होती. हडपसरमध्येही चेतन तुपे आणि आढळराव यांच्यातही दुरावा असल्याची चर्चा आहे, त्यामुळे आढळराव यांनीही हडपसरचे दौरे कमी झाल्याचे चित्र आहे.

Shivajirao Adhalrao Patil
Pankaja Munde : धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात जाताच पंकजा मुंडेंची आश्चर्यकारक प्रतिक्रिया; म्हणाल्या ‘चांगला पर्याय निवडलाय’

शिरूर, आंबेगावमध्ये मान

शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांना राष्ट्रवादीत घेऊन, त्यांना विधानसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून उमेदवारी आणि विजयामध्ये आढळराव पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे आमदार कटके यांनी अनेक कार्यक्रमांमधून जाहीररित्या सांगितले आहे.

तसेच, आंबेगाव मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी ताकद लावून विजयश्री खेचून आणण्यात महत्वाची भूमिका आढळराव पाटील यांनी निभावली होती. त्यामुळे शिरूर-आंबेगावात आढळराव पाटील यांना मानाने पान मिळते. मात्र, इतर तीन तालुक्यांत आढळरावांना डावललेले जात असल्याचे चित्र आहे.

Shivajirao Adhalrao Patil
Mahadev Jankar : महादेव जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; थेट दिल्लीतून केली घोषणा (Video)

अजित पवार मनोमिलन घडविणार का?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची दमदार कामगिरी व्हायची असेल तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी पक्षाध्यक्ष अजित पवार बेनके, मोहिते, तुपे आणि आढळराव पाटील यांची एकत्रित बैठक घेऊन, मनोमिलन घडविणार का? असा सवाल सध्या विचारला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com