Uday Samant, Sanjay Raut
Uday Samant, Sanjay Rautsarkarnama

Uday Samant News : मंत्री उदय सामंतांचा संजय राऊतांना खोचक सल्ला; म्हणाले, रोज सकाळी...

Political News: मंत्री उदय सामंतांनी सांगितले 'ते' प्रकरण कोणाच्या काळातील
Published on

Pune : विधानसभेत उद्धव ठाकरे गटाकडून सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटाला टार्गेट केले. धारवीचा मोर्चा, भ्रष्टाचाराचा आरोप करून ठाकरे गटाने शिंदे गटाला इशारा दिला होता. शिंदे गटाकडून ही त्याला चोख उत्तर देण्यात येत आहे. पुण्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कॅगच्या अहवालाचा संदर्भ देत थेट संजय राऊत यांना टार्गेट केले आहे.

एमआयडीसी बाबत कॅगचा अहवालावर रोज सकाळी जे प्रेस कॅान्फरन्स घेतात त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कॅगच्या अहवालात घेण्यात आलेले आक्षेप कोणाच्या काळातील कारभारावर घेण्यात आले हे त्यांनी प्रेस कॅान्फर्न्स घेऊन सांगावे, असा टोला संजय राऊत (Sanjay raut) यांना सामंत यांनी लगावला.

Uday Samant, Sanjay Raut
Bhujbal Vs Jarange : " असल्या कोल्हे-कुईला दाद देत नाही,त्यांच्या जन्मापासून..."; भुजबळांचा जरांगेंवर पलटवार

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बुधवारी विधानसभेत 'एमआयडीसी'च्या लेखापरीक्षणाचा २०२३ चा कॅगचा अहवाल मांडला. यामध्ये 'एमआयडीसी'चे जमीनवाटप आणि शुल्कवसुलीसाठी काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ठोस नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने भूखंडवाटप आणि त्यानंतरची विविध शुल्क आकारण्याबाबत पारदर्शकतेचा अभाव दिसून आल्याचे अहवालात म्हटले आहे.

कॅगच्या अहवालानंतर उदय सामंत यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई उद्योग मंत्री असतानाच्या काळातील एमआयडीसे भुखंड वाटप झाल्याचा दावा केला. तसेच विधानपरिषद अध्यक्षा निलम गोऱ्हे यांना संस्कृतमध्ये पत्र लिहणाऱ्या ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रिया देताना आपला संस्कृतीचा अभ्यास नाही. अभ्यास करतो आणि नंतर प्रतिक्रिया नेते, असे मत सुषमा अंधारे यांना महत्व देण्याचे टाळले.

'सगेसोयरे'वर स्पष्टीकरण

मराठा आरक्षण देताना आईकडील नात्यात सुद्धा आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. या मागणीवर ते ठाम आहेत. त्यावर सामंत म्हणाले की, रक्ताचे नातेवाईक किंवा रक्ताचे सगेसोयरे हे वडिलांकडील नातेवाईकांसाठी आहे. आईकडील नातेवाईकांसाठी नाही. आईची जात मुलांना लागू होत नाही. हे जगजाहीर आहे. कायद्यातही तसेच आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रक्ताचे किंवा सगेसोयरे नातेवाईक म्हणजे वडिलांकडील नातेवाईक असाच अर्थ होतो.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com