Video Uddhav Thackeray : मी ढेकणाला आव्हान देत नाही, त्यांना चिरडायचं असतं; ठाकरेंचा फडणवीसांवर जिव्हारी लागणारा घाव

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : "एकतर तू राहणार किंवा मी," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर मुंबईत टीका केली होती. त्यानंतर पुण्यातूनही ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
uddhav thackeray
uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना ढेकणाची उमपा दिली आहे. तसेच, तू राहूच शकत नाही. तुझा बंदबोस्त करण्यासाठी मैदानात उतरलो आहे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.

'चला जिंकूया....', अशी गर्जना करीत शिवसेनेचा 'शिवसंकल्प' मेळावा पुण्यात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "आता लढाई मैदानात होणार आहे, हॉलमध्ये नाही. एकतर तू राहशील किंवा मी राहीन, असं मी म्हटलं. काहींना वाटलं त्यांना हे आव्हान दिलं आहे. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे. मी म्हणजे माझा संस्कारिक महाराष्ट्र आहे. तू म्हणजे महाराष्ट्रातील दरेडेखोर टोळक्यांचा अख्खा पक्ष आहे."

"ढेकणाला मी कधी आव्हान देत नाही. ढेकणं बोटानं चिरडायची असतात. त्यामुळे कुणाला तरी वाटले, त्यालाच बोलतोय. त्यांनी सांगितलं, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढा कुवतीचा तू नाहीच आहे," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

"लाडकी बहीण योजना देऊन तुम्ही मत विकत घेत आहात का? महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. भिकेवर जगणारा नाही. 1500 रूपयांत घर चालणार आहे का? हक्काचं मागितलं तर ईडी आणि सीबीआय मागे लावतात. हेच मोदी आणि शहांचे धोरण आहे. हा लढा माझा आणि शिवसेनेचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com