Uddhav Thackeray News : पुण्यातून उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; '...म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा'

Political News : उद्धव ठाकरे, संजय राऊत हे बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आढाव यांच्या समोरच महायुती सरकारच्या कारभारावर व निवडणूक गैरप्रकारावर भूमिका मांडली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून एक आठवडा झाला आहे. गेल्या शनिवारी राज्यातल्या जनतेने भाजप आणि महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. निकाल देऊनही आठवड्यानंतरही राज्यात काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत, नवा मुख्यमंत्री आणि सरकार राज्याला मिळालेले नाही. विधानसभेआधी आम्ही एक आहोत, हायकमांड घेईल तो निर्णय मान्य असेल, असे म्हणणारे महायुतीचे नेते सत्तास्थापन करू शकले नाहीत. विधानसभेची मुदत संपली तरी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू का केली जात नाही? असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. (Uddhav Thackeray News)

बाबा आढाव यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. शनिवारी सकाळी बाबा आढाव यांची भेट शरद पवार यांनी घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत हे बाबा आढाव यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आढाव यांच्या समोरच महायुती सरकारच्या कारभारावर व निवडणूक गैरप्रकारावर भूमिका मांडली.

Uddhav Thackeray
BJP CM News : भाजपामध्ये एकही महिला मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नाही का? अखेर ठाकरेंच्या 'फायरब्रँड' नेत्यानं वात पेटवलीच

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारची स्थापना होत नसल्याबद्दल महायुतीवर जोरदार टीका केली. त्यासोबतच एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, एवढे प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राजभवनात जाण्याऐवजी शेतात का जात आहेत. अमावस्येचा दिवस का निवडत आहेत. त्यांची मुख्यमंत्री कोण होणार किंवा उपमुख्यमंत्री कोण होणार याची काहीच तयारी नाही. बहुमत मिळाल्यावर त्यांच्याकडे आनंदोत्सव नाही. सर्वांचे चेहरे पडले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

Uddhav Thackeray
Kolhapur BJP : महायुतीला दमदार यश मिळूनही बसणार भूकंपाचे हादरे? नाराज भाजप कार्यकर्ते मोठं पाऊल उचलणार

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून आत्मक्लेश आंदोलन करणाऱ्या बाबा आढावांनी शनिवारी दुपारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी घेत आपले उपोषण सोडले. EVM वर आक्षेप घेत तीन दिवसांपासून बाबा आढाव आंदोलन करत होते. आढाव यांच्या आंदोलनाला शरद पवार, अजित पवार यांनी भेट दिली होती.

Uddhav Thackeray
BJP Politics : शिंदेंची भाजपकडून आणखी कोंडी, चार मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येत नसल्याने विरोधकांना टीका करण्यासाठी आयते कोलीत सापडले आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे.

Uddhav Thackeray
Nagpur Politics News : विदर्भातील राजकारण तापले; नाना पटोलेनंतर काँग्रेसचा दुसरा नेता टार्गेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com