Nagpur Politics News : विदर्भातील राजकारण तापले; नाना पटोलेनंतर काँग्रेसचा दुसरा नेता टार्गेट

Political News : उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात आपल्या विरोधात काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी केला. लोकांची दिशाभूल केली, बदनामी केली, खोटा नॅरेटिव्ह निर्माण केला, असा आरोप भाजपचे उमेदवार व माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांनी केला.
Congress Candidates 2024
Congress Candidates 2024Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मी दलित नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, डमी उमेदवार आहे, असा अपप्रचार अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात आपल्या विरोधात काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी केला. लोकांची दिशाभूल केली, बदनामी केली, खोटा नॅरेटिव्ह निर्माण केला, असा आरोप भाजपचे उमेदवार व माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांनी केला. याच कारणामुळे माझा पराभव झाला. राऊत यांच्या या कृत्याच्या विरोधात आपण जनतेच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे माने यांनी सांगितले. (Nagpur Politics News)

पराभव झाल्यानंतर पाच दिवसांनी माने आपले जात प्रमाणपत्र घेऊन पत्रकारांसमोर आले. ते म्हणाले, मी बौद्ध नसून मातंग समाजाचा असल्याचे दोन निवडणुकांपासून खोटा नॅरेटिव्ह नितीन राऊत (Nitin Raut) आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पसरवत आहेत. माझ्याकडे जातीचा दाखला आहे. त्यावर बौद्ध असाच उल्लेख आहे. 14 ऑक्टोबर 1956 ला माझ्या आई-वडिलांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे.

Congress Candidates 2024
BJP Politics : शिंदेंची भाजपकडून आणखी कोंडी, चार मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप

मी भाजपचा (BJP) कार्यकर्ता असल्याने संघाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाते. आम्ही सर्वच कार्यक्रमांना जात असतो. याचा अर्थ कार्यक्रमाला येणारा प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक असतो असा होत नाही. मात्र, याच कार्यक्रमाचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

Congress Candidates 2024
Paranda Assembly Election : धाराशिवमध्ये टेन्शन वाढले; 'या' मतदारसंघात होणार फेरमतमोजणी, 18 मशिनची भरली रक्कम

कोरोनाच्या काळात वाल्मिक समाजाचा सफाई कामगार अभिजित तांबे यांने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाने मरण पावलेल्यांवर अग्निससंस्कार केले होते. त्याच्या कार्यामुळे आपण त्याचा पाय धुवून सत्कार केला होता, असे असतानाही बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा प्रचार करण्यात आला. मी डमी उमेदवार आहे, असा खोडसाळ प्रचारसुद्धा करण्यात आला असल्याचे माने यांनी सांगितले.

Congress Candidates 2024
Assembly Election Results : महाराष्ट्रातील आकडे बदलणार? काँग्रेसनं केलं मोठं काम, आता निर्णय आयोगाच्या हाती

खैरलांजी आंदोलनादरम्यान राज्यात आघाडीचे सरकार होते. नितीन राऊत मंत्री होते. त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्या विरोधात एमपीडीए लावला. 14 दिवस तुरुंगात ठेवले होते, असेही मिलिंद माने यांनी सांगितले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आपली सुटका केली. मात्र, राऊत यांनी आपली सुटका केली असे भासवले. सुटकेचे पेपर घेऊन ते आले होते. मात्र, भंते सुरई ससाई यांच्या विनंतीवरून तसेच आपल्या विरोधात एकही पुरावा आढळला नसल्याने सुटका करण्यात आली असल्याचे माने यांनी सांगितले.

Congress Candidates 2024
ShivSena Politics : 'गृहखात्यावर 'डॅशिंग' माणूस असावा अन् अर्थ खातं 'सक्षम' माणसाकडे..!', संजय शिरसाटांना सुचवायचंय तरी काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com