Girish Mahajan News : गिरीश महाजनांचा पालकमंत्रिपदाचा मार्ग मोकळा, घोषणेला का होतोय विलंब?

Girish Mahajan Nashik Guardian Minister Post : एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नाशिक जिल्ह्यात केवळ दोन आमदार आहेत. मात्र यापूर्वी शिंदे पक्षाचे दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते. त्यामुळे नाशिकवर शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला आहे.
Devendra Fadanvis & Girish Mahajan
Devendra Fadanvis & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या घोषणेला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकचे पालकमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली होती. रायगडच्या पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांची घोषणा झाली होती. या दोन्ही नियुक्त त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा होताच काही तासात स्थगिती दिली. मात्र, त्यावर अजून तोडगा निघाला नाही. मात्र, गिरीश महाजन यांचे नाशिकचे पालकमंत्रिपद कायम राहणार आहे.

गेल्या दोन महिन्यात पालकमंत्रिपदा संदर्भात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयाने निकाल दिला. त्यामुळे मंत्री कोकाटे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक असले तरी त्यांनी उघडपणे मागणी करणे टाळले होते.

Devendra Fadanvis & Girish Mahajan
Beed Satish Bhosale : आता 'खोक्या'ची पळता भुई थोडी होणार; वनमंत्री नाईकांची इकडं प्रतिक्रिया, तिकडं वनविभागाची छापेमारी...

एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नाशिक जिल्ह्यात केवळ दोन आमदार आहेत. मात्र यापूर्वी शिंदे पक्षाचे दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री होते. त्यामुळे नाशिकवर शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला आहे. शिवसेना या संदर्भात आक्रमक आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्रश्नांवर शासनाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून एकनाथ शिंदे आणि महायुतीमधील नेत्यांची राजकीय ओढाताण लपून राहिलेली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सध्याच्या राजकीय विसंवादाचा अचूक लाभ उचलला आहे. त्यांनी नियुक्ती वरील स्थगिती उठवली नाही. मात्र जलसंपदा मंत्री महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असतील, असे संकेत विविध प्रकारे दिले आहेत. सिंहस्थची आढावा बैठक नुकतीच सह्याद्री अतिगृहावर झाली.

कुंभमेळा आढावा बैठकीला महाजन उपस्थित

सिंहस्थाच्या आढावा बैठकीला जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. या बैठकीत जलसंपदामंत्री महाजन यांनी भाग घेत विविध सूचना केल्या. मात्र या बैठकीला जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधी तसेच मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. याद्वारे गिरीश महाजन हेच नाशिकचे पालकमंत्री असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्या नावाला पसंती दिली आहे. सध्या या नियुक्तीच्या आड येईल, असे कोणीही नाही. यासंदर्भात अन्य सहकारी पक्षाने देखील आपल्या राजकीय तलवारी जवळपास मॅन केल्या आहेत.

गिरीश महाजनच पालकमंत्री

महायुतीच्या सहकारी पक्षांचे राजकीय अजेंडा पाहता शिवसेना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर विशेष रस आहे. या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत. त्या दृष्टीने त्यांनी नाशिक ऐवजी रायगडला पसंती दिल्यास वावगे ठरणार नाही. असे असल्याने नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड जवळपास निश्चित मानले जाते. मात्र मुख्यमंत्री एक घोषणा सातत्याने लांबणीवर टाकत आले आहेत. पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे नियुक्ती का होत नाही? याबाबत राजकीय कार्यकर्ते आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चेचे फड रंगू लागले आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)


Devendra Fadanvis & Girish Mahajan
MLA Suresh Dhas On Dhananjay Munde : सुरेश धस फास आवळणार, दोनशे कोटींच्या घोटाळाप्रकरणी आता ईडीकडे तक्रार करणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com