Uddhav Thackeray News: मिशन महापालिका! विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच पुणे दौरा; 180 इच्छुकांची वाढली धडधड

Uddhav Thackeray Pune visit: विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांसह इतर नेत्यांनी पक्षाला रामराम करत महायुतीतील पक्षांमध्ये पक्षप्रवेश केल्याचा पाहायला मिळालं.
Uddhav Thackeray  .jpg
Uddhav Thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: विधानसभा निवडणुकीनंतर पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांसह इतर नेत्यांनी पक्षाला रामराम करत महायुतीतील पक्षांमध्ये पक्षप्रवेश केल्याचा पाहायला मिळालं. त्यानंतर शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख हे पुण्यातील शाखाप्रमुखांची भेट घेण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

त्यानंतर मार्च महिन्यातील ही दोन-तीन तारखा सांगून या तारखेला उद्धव ठाकरे हे पुण्यात येऊन कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मनोबल वाढवणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळेसही त्यांचा दौरा होऊ शकला नाही. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे पुणे दौऱ्यावर येणार असून यावेळी ते महानगरपालिका निवडणुका लढवण्यास इच्छुक असलेल्या 180 जणांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षाकडून यापूर्वीच 'मिशन पुणे' लॉन्च करण्यात आले आहे. त्या अंतर्गत पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. आतापर्यंत तब्बल 180 इच्छुकांनी ठाकरे सेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. या इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात आले आहेत. यासाठी होय मी नगरसेवक होणारच हे कॅम्पेन राबविण्यात आले आहे.

आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी या 180 इच्छुकांची भेट घेऊन त्यांच्या समवेत आगामी महापालिका निवडणुकीबाबतची चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चार ऑक्टोबर रोजी उद्धव ठाकरे हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत.

Uddhav Thackeray  .jpg
Dharashiv Flood Help Kit Controversy: पूरग्रस्तांच्या 'मदत किट'वर शिंदे-सरनाईकांचे फोटो छापणं भाजपच्या बड्या नेत्यालाही खटकलं; म्हणाले...

या दौऱ्या दरम्यान ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांशी संवाद साधणार आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी मुंबई येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. याच भेटीदरम्यान या कार्यक्रमाबाबत चर्चा झाली असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com