Pune News : महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी नेतेमंडळी प्रयत्नशील असले तरी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षात रस्सीखेच पहावयास मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीतील (MVA) ठाकरे गटात तिढा पहावयास मिळत होता. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून इच्छुकांमध्ये संघर्ष सुरू होता. आता या ठिकाणाचा तिढा सुटला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांना शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आगामी काळात होत असलेल्या या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने तयारी केली आहे. या निवडणुकीत ठाकरे गट बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे. या मतदारसंघातील आमदार दिलीप मोहिते यांना पाडण्यासाठी ठाकरे गटाने फिल्डिंग लावली आहे. अजित दादांच्या शिलेदाराला पाडण्यासाठी ठाकरे गटाने फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
गेल्या अनेक दिवसापासून जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, माजी सभापती अमोल पवार आणि बाबाजी काळे यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार देखील शिवसेना पक्षात प्रवेश करून लढण्याची तयारीत होते. त्यामुळे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
या जागेवरील तिढा आता सुटला आहे. याठिकाणचा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटला असून त्यामुळे याठिकाणी इच्छुकांत असलेली रस्सीखेच थांबली आहे. जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, माजी सभापती अमोल पवार आणि बाबाजी काळे यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. आता शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी बाबाजी काळे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.