

Pune News: केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे दुखःद निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गुरुवारी (ता. 18 जून) रात्री 10.20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
किसनराव दगडोबा मोहोळ यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल 40 वर्षे सेवा बजावली होती. शिवाय त्यांनी नामवंत पैलवान म्हणून नावलौकिक मिळवला होता. एकेकाळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांनी कुस्तीचा आखाडाही गाजवला आहे.
किसनराव मोहोळ यांनी त्यांच्या सेवाभावी वृत्ती व कर्तव्यनिष्ठ स्वभाव यांना मोठा समुदाय जोडला होता. तसेच सहकार क्षेत्रातही त्यांना वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांना यश आलं होतं. ते नामवंत पैलवान म्हणूनही परिचित होते.
मुरलीधर मोहोळ यांच्या वडील किसनराव मोहोळ यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी शुक्रवारी (ता.. 19 जून) सकाळी 7 ते 9 या वेळेत कोथरूड येथील वेणूकृष्णा निवासस्थान येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मंत्री व भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांना पैलवानकीचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला होता. मोहोळ कुटुंबच मूळ पैलवानांच्या परंपरेतील आहे. त्यांचे कुटुंब 1975 मध्ये पुण्यात स्थलांतरित झाले आणि ते कोथरूड येथे स्थायिक झाले.
मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या महाविद्यालयीन शिक्षणासोबतच कुस्तीचे धडे गिरवणे सुरू ठेवले होते. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी कोल्हापूरमधून कुस्तीचे औपचारिक प्रशिक्षणही घेतले.तसेच शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे.
मोहोळ यांनी नंतर कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडून 1996 च्या सुमारास राजकारणात प्रवेश केला. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती, पण थोड्या फरकाने त्यांचा पराभव झाला。
मुरलीधर मोहोळ हे 2017 मध्ये ते तिसऱ्यांदा पुणे महानगरपालिकेवर निवडून आले आणि त्यांना महत्त्वाचे 'स्थायी समिती अध्यक्ष' पद मिळाले. पुण्याचे महापौर म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द भूषवली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते प्रचंड मतांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी विरोधी उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
पहिल्याच टर्ममध्ये त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली असून त्यांनी सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे。
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.