BJP vs Congress : भाजपला धक्का; विधानपरिषद निवडणुकीत दोन आमदारांचे काँग्रेसला मतदान, राज्यसभेतही भीती

Karnataka MLC Election, Cross Voting News : निवडणुकीआधी भाजपने आपले आमदार हॉटेलमध्ये हलविले होते. त्यावरून भाजपला फुटीची भीती असल्याचा दावा आघाडीकडून करण्यात आला होता.
BJP vs Congress (AI Image)
BJP vs Congress (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

Jharkhand Rajya Sabha Election : कर्नाटकात विधानपरिषदेच्या सात जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपला धक्का बसला आहे. पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या दोन आमदारांनी सत्ताधारी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही आमदारांनी मतदानाची जाहीर कबुली दिली आहे. एवढेच नाही तर झारखंडमधील राज्यसभा निवडणुकीत भाजपला क्रॉस वोटिंगची भीती असल्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपने निलंबित केलेले आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवाराम हेब्बार यांनी आपण काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केल्याचे सांगितले. मतदानाच्या काही तास आधीच या दोघांचा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबतचा एकत्रित फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्याचवेळी हे दोन्ही आमदार काँग्रेसच्या बाजूने मतदान करणार असल्याचे संकेत मिळाले होते.

विधानपरिषदेच्या सात जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने पाच तर भाजपने तीन उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी सध्याच्या आमदारसंख्येपेक्षा तीन अधिकच्या मतांची गरज आहे. तर काँग्रेसला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी अधिकची पाच मते आवश्यक आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाचे किती आमदार क्रॉस वोटिंग करणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपसह काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या पक्षात क्रॉस वोटिंग होणार नसल्याचा दावा केला आहे.

BJP vs Congress (AI Image)
Shiv Sena UBT news : ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिल्लीतील बैठकीबाबत महत्वाची अपडेट; चार खासदारांची उपस्थिती, कुणाची दांडी?

राज्यसभा निवडणुकीतही भीती

झारखंडमध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचा प्रत्येक एक उमेदवार रिंगणात आहे. तर एका अपक्ष उमेदवाराला भाजपने पाठिंबा दिला आहे. मात्र, हा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला मतांची बेगमी करावी लागणार आहे. इंडिया आघाडीकडे ५६ मते असून दोन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात.

BJP vs Congress (AI Image)
Shiv Sena crisis : ठाकरेंच्या 6 खासदारांनी टाकलेल्या डावासमोर कोणतीच 'स्ट्रॅटेजी' चालेना; पहिलीच चाल फसली?

निवडणुकीआधी भाजपने आपले आमदार हॉटेलमध्ये हलविले होते. त्यावरून भाजपला फुटीची भीती असल्याचा दावा आघाडीकडून करण्यात आला होता. तर आपलाच उमेदवार विजयी होणार असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे मतदानानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे भाजपच्या काही आमदारांसोबत चहापान करताना दिसून आले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com