Eknath Shinde : उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पुण्यातील प्रवाशांनी मानले मुख्यमत्र्यांचे आभार !

Eknath Shinde : अभिजीत दरेकर यांचा मला फोन आला. काळजी नका करू मुख्यमंत्री साहेबांनी उत्तराखंड येथील प्रशासनाची संपर्क साधला आहे, तुमची व्यवस्था होईल.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मंचर : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) अडकलेल्या पुण्यातील प्रवाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी मदत केल्यानं शंभरहून अधिक ज्येष्ठ प्रवाशांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले आहे.

आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील व भोसरी परिसरातील शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिक चारीधाम यात्रेसाठी उत्तराखंड राज्यात गेले होते. यमुना जेट्टी -बालकोट रस्त्यावर दरड कोसळल्याने मंगळवारी( ता. 11 ) रात्री हे सर्व भाविक अडकले होते. "सर्वजण भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांची सुटका करून निवासाची हॉटेलमध्ये व्यवस्था करण्याचे काम स्थानिक प्रशासनाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामुळेच झाली. अन्यथा आमचे अतोनात हाल झाले असते," अशी माहिती यात्रेकरू सेवानिवृत्त लष्करातील अधिकारी जयराम शंकर पोखरकर यांनी सांगितले.

पोखरकर म्हणाले "मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता रस्ता ब्लॉक झाल्याने घाटामध्ये आमच्या पुढे असंख्य गाड्या अडकल्या होत्या. रात्री अकरा वाजले पण वाहतूक सुरू झाली नाही. पिण्यासाठी असलेले पाणीही बस मधून संपले होते. पावसात बाटल्या धरून पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. भुकेने सर्वजण व्याकुळ झाले होते. अनेकांची शुगर वाढली होती. सर्वजण काळजीत पडले होते. काळोखी रात्र व पडणारा मुसळधार पाऊस यामुळे काहीच सुचत नव्हते. पण मोबाईलला रेंज होती. युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांना फोन करून ओढवलेल्या संकटाची माहिती दिली. त्यांनी ताबडतोब मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत यांच्याबरोबर संपर्क केला,"

Eknath Shinde
Rutuja Latake : लटकेंच्या राजीनाम्यावर आज निर्णय ; ठाकरे गट गॅसवर, भाजपची 'वेट अँड वॉच' ची भूमिका

"थोड्यावेळाने मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी अभिजीत दरेकर यांचा मला फोन आला. काळजी नका करू मुख्यमंत्री साहेबांनी उत्तराखंड येथील प्रशासनाची संपर्क साधला आहे, तुमची व्यवस्था होईल. त्यानंतर पुन्हा दोन-तीन वेळा त्यांनी फोन करून आम्हाला धीर दिला. सचिन बांगरही आमच्या सतत संपर्कात होते. बुधवारी रात्री एक वाजता पोलीस व महसूल खात्यातील अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी जवळच असलेल्या हॉटेलमध्ये नेण्याची भोजनाची व निवासाची व्यवस्था केली. संकट काळात मुख्यमंत्री मदतीने साठी धावून आल्यानंतर सर्व भाविकांनी त्यांच्या त तत्पर कामकाजाबद्दल धन्यवाद देऊन अभिनंदन केले,"असे पोखरकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com