Vaishnavi Hagwane Case : वैष्णवीला छळणाऱ्या नणंद करिष्माचे राष्ट्रवादीच्या महिला नेत्यासोबत फोटो; सुषमा अंधारें म्हणाल्या , 'थुंकणाऱ्या...'

Vaishnavi Hagwane Karishma Hagwane NCP : सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की, 'गुन्हेगारांना राजकीय पाठबळ कसे मिळते किंवा गुन्हेगार स्वतःची राजकीय प्रतिष्ठा कसे वाढवतात यासाठी हे दोन फोटो बोलके आहेत.
Karishma, accused in the Vaishnavi harassment case, seen alongside a prominent NCP woman leader
Karishma, accused in the Vaishnavi harassment case, seen alongside a prominent NCP woman leadersarkarnama
Published on
Updated on

Vaishnavi Hagwane Suicide : राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने आत्महत्ये केली. या प्रकरणात सात दिवसांपासून फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा सुशील हगवणे यांना पोलिसांनी आज पहाटे अटक केली. वैष्णवीचा सासरे राजेंद्र हगवणे, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा या छळ करत होत्या. करिष्मा हीतर वैष्णवीच्या अंगावर थुंकली होती, असे करिष्माच्या वडिलांनी सांगितले.

करिष्मा हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे. हगवणे परिवार हा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचे सांगत विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत करिष्मा हगवणे असलेले फोटो आपल्या फेसबूकवरून शेअर करत टिका केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की, 'गुन्हेगारांना राजकीय पाठबळ कसे मिळते किंवा गुन्हेगार स्वतःची राजकीय प्रतिष्ठा कसे वाढवतात यासाठी हे दोन फोटो बोलके आहेत. हे फोटो गर्दीत कुणीतरी येऊन उभे राहून काढलेले फोटो नाहीत तर अगदी फोटोतील वावर बघितला तरी लक्षात येतं की, राजकीय नेत्यांशी असणारे यांचे संबंध कौटुंबिक स्नेहाचे आहेत. यातल्या पहिल्या फोटोमध्ये चाकणकर यांच्या बाजूला उभा असणारा तरुण हा सुशील हगवणे आहे जो मयुरी हगवणे चा नवरा आहे. ज्या मयुरीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती.'

Karishma, accused in the Vaishnavi harassment case, seen alongside a prominent NCP woman leader
Pune Vaishnavi Hagawane : एकापाठोपाठच्या 'या' 4 मोठ्या दणक्यांमुळे राजेंद्र हगवणे अन् दीर सुशीलचे पळण्याचे मार्गच संपले अन् पहाटेच पोलिसांनी मुसक्या आवळल्या

'दुसऱ्या फोटोमध्ये राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे दिसत आहेत. फोटो अजिबात गर्दीतला नाही तर अतिशय निगुतीने सलगीने काढलेला फोटो आहे. फोटोमध्ये लाल ड्रेसवर दिसणारी तरुणी ही वैष्णवीची ननंद करिष्मा हगवणे आहे. जी करिष्मा वैष्णवीवर थुंकली. एका महिलेवर थुंकणारी दुसरी महिला महिला बालकल्याण मंत्र्याच्या बाजूला बसते.', अशी टीका अंधारे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधून केली आहे.

आरोपींना राजकीय पाठबळ

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणांमध्ये पहाटे साडेचार वाजता दीर आणि सासरा यांना अटक झाली. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले की आरोपी स्वतः हून हजर झाले अजून स्पष्ट झाले नाही. जर आरोपी स्वतःहून हजर झाले असतील तर आरोपींना राजकीय पाठबळ आहे हे गोष्ट अधिकच जात अधोरेखीत होते, अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Karishma, accused in the Vaishnavi harassment case, seen alongside a prominent NCP woman leader
Rajendra Hagwane Arrest : राजेंद्र हगवणेला लपण्यासाठी कोणी मदत केली, सगळं बाहेर येणार! भावाचीही चौकशी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com