Rohini Khadse News : पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ, अध्यक्षा या पातळीवर येऊन पोहचल्या!

Criticism Against Rupali Chakankar and Public Reaction : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Rohini Khadse News : पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ, अध्यक्षा या पातळीवर येऊन पोहचल्या!
Published on
Updated on

Pune News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर चौफेर टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षातील महिला नेत्यांनी चाकणकरांविरोधात आघाडी उघडलेली असतानाच स्वपक्षातील काही महिला नेत्यांनीही महिला आयोगाच्या कामकाजावर उघड नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्यांना धमकावले जात असल्याचं खडसे यांनी सांगितले आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र, पूर्णवेळ व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून खडसे आणि चाकणकर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा पक्षात महत्त्वाच्या पदावरही कार्यरत असल्याने त्या दुहेरी भूमिका बजावत आहेत. यामुळे त्यांना महिला अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणांवर लक्ष केंद्रित करता येत नाही, असा आरोप खडसे यांनी केला आहे.

Rohini Khadse News : पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ, अध्यक्षा या पातळीवर येऊन पोहचल्या!
Lalu Prasad Yadav : रिलेशनशिपच्या पोस्टने हादरलेल्या लालूंचा सर्वात मोठा निर्णय; मुलाची कुटुंबासह पक्षातूनही हकालपट्टी

राज्याला "पार्ट टाइम" नव्हे तर "फुल टाईम" महिला आयोग अध्यक्ष हव्या असल्याची जनतेची भावना असून, महिला आयोगाच्या पदावर कोणत्याही राजकीय दबावाशिवाय काम करणारी, स्वतंत्र आणि पूर्णवेळ व्यक्ती हवी, अशी मागणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

रोहिणी खडसे यांनी ‘एक्स’वर एक कॉल रेकॉर्डिंग पोस्ट केले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक महिला पदाधिकारी असल्याचं सांगत चाकणकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट बाबत दुसऱ्या महिलेला जाब विचारताना पाहायला मिळत आहे. या कॉल रेकॉर्डिंग च्या अनुषंगाने रोहिणी खडसे यांनी पुन्हा एकदा चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.

Rohini Khadse News : पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ, अध्यक्षा या पातळीवर येऊन पोहचल्या!
Vaishnavi Hagawane Case : निलेश चव्हाणची आता सुटका नाही; मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचं मोठं पाऊल

खडसे म्हणाल्या, आता पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे... त्यामुळे अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत. महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहे. महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com