Vaishnavi Hagwane Suicide : वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येची राष्ट्रीय पातळीवर दखल, थेट पोलिसांना केल्या सूचना

Vaishnavi Hagwane National Commission For Women : वैष्णवीने 16 मे रोजी गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवीचे पोस्टमार्टम ससून रुग्णालयात करण्यात आले. त्यामध्ये गळा आवळल्याने वैष्णवीचा मृत्यू झालाचे समोर आले आहे.
The National Commission for Women has taken cognizance of Vaishnavi Hagwane’s suicide and directed a formal investigation into the allegations.
The National Commission for Women has taken cognizance of Vaishnavi Hagwane’s suicide and directed a formal investigation into the allegations.sarkarnama
Published on
Updated on

Vaishnavi Hagwane News : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवीच्या वडिलांनी जावई शशांक हगवणे याच्यासह राजेंद्र हगवणे, त्यांची पत्नी, मुलीच्या विरोधात पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार केली. वैष्णवीच्या आत्महत्येची दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे.

आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचलकांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पोलिसांना या प्रकरणाचा तातडीने निष्पक्ष चौकशीचा आदेश देखील दिला आहे. आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तत्काळ अटक करण्यास सांगितले आहे. दरम्यान, तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, राजेंद्र हगवणे हे अजून फरार आहे.

राजेंद्र हगवणे यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करणयात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असून राजेंद्र हगवणे यांची पत्नी, मुलगा आणि मुलीला अटक करण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

The National Commission for Women has taken cognizance of Vaishnavi Hagwane’s suicide and directed a formal investigation into the allegations.
Vijay Wadettiwar: रेल्वे तिकिटांवर ऑपरेशन सिंदूर, मोदींचा फोटो कशासाठी? वडेट्टीवारांचा भाजपला सवाल

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय?

वैष्णवीने 16 मे रोजी गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवीचे पोस्टमार्टम ससून रुग्णालयात करण्यात आले. त्यामध्ये गळा आवळल्याने वैष्णवीचा मृत्यू झालाचे समोर आले आहे. तसचे तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा देखील होत्या. अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

वैष्णवीचा मानसिक छळ

वैष्णवीचा पती शशांक आणि सासरे राजेंद्र हगवणे, सासू यांनी मिळून मानसिक छळ केला. शशांक याने जमिन खरेदीसाठी वैष्णवीला तिच्या वडिलांकडून दोन कोटी रुपये आणण्यास सांगितले होते. वैष्णवीने आत्महत्येपूर्वी हीबाब आपल्या माहेरी सांगितले होते. शशांक याने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत ती गरोदर असताना ते बाळ आपले नसल्याचे म्हटले होते.

The National Commission for Women has taken cognizance of Vaishnavi Hagwane’s suicide and directed a formal investigation into the allegations.
Ashok Chavan News : अशोक चव्हाण टॉप गिअर टाकणार; अमित शहांच्या नांदेड दौर्‍यात काँग्रेसला मोठे धक्के देण्याची तयारी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com