Vaishnavi Hagwane case : 'कपडे फाडले..मोबाईल फोडला अन्...'! वैष्णवीच्या जाऊबाईने सांगितली अंगावर काटा आणणाऱ्या छळाची आपबीती

Vaishnavi Hagwane Mayuri Hagwane : मी जेव्हा पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली तेव्हा माझी तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्यात आला, असे वैष्णवीने सांगितले
Mayuri Hagwane speaks out on the cruelty she allegedly faced from Rajendra and Shashank Hagwane.
Mayuri Hagwane speaks out on the cruelty she allegedly faced from Rajendra and Shashank Hagwane.sarkarnama
Published on
Updated on

Vaishnavi Hagwane suicide : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सूनबाई वैष्णवी हिने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात राजेंद्र हगवणे यांच्यासह त्यांच्या पत्नी मुलांवर गुन्हा दाखल आहे. राजेंद्र हगवणे यांनी त्यांच्या मोठ्या सून मुयरी हिला देखील मारहाण केली होती. वैष्णवीच्या मृत्यूनंतर मुयरी या समोर आल्या असून हगवणे कुटुंबीय किती क्रूरपणे वागत होते याची माहिती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना मयुरी म्हणाली, 'ते (हगवणे कुटुंबीय) क्रूर आहेत. माझे सासरे, दीर शशांक यांनी मला घरात आणि रस्त्यावर देखील मारहाण केली. माझ्या नवऱ्याला दीर शशांक हा देखील मारहाण करत होतो. एका भांडणात दीर शशांकने आपल्या खाली पाडून मारहाण करत केस ओढले. आणि माझा मोबाईल घेऊन पळ काढला. त्या मोबाईलमध्ये मी मारहाणीचा व्हिडिओ रेकाॅर्ड केला होता. मला सासऱ्यांनी मारून कपडे पाडत माझा विनयभंग केला होता.'

'मी जेव्हा पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली तेव्हा माझी तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्यात आला. माझ्या माहेरील लोकांविरोधात पोलिसांमध्ये खोटी तक्रार दिली. मी तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मी दीड वर्ष त्या घरात माझ्या नवऱ्यासोबत वेगळी राहत होते. मी शेकडीवर स्वयंपाक केला. मला सासरे सासूंनी कसलीच मदत केली नाही की आम्हाला बाहेर राहून देखील दिले नाही.', असे देखील मयुरी हिने सांगितले.

Mayuri Hagwane speaks out on the cruelty she allegedly faced from Rajendra and Shashank Hagwane.
Vaishnavi Hagwane Baby : वैष्णवीचे बाळ आले आजोबांच्या कुशीत; अज्ञात व्यक्तीचा फोन अन् हायवेवर फिल्मीस्टाईलने ताबा...

वैष्णवीला उन्हात उभे केले

मयुरीने सांगितले की, तिला वैष्णवीशी कधीच बोलू दिले नाही. तिला जेव्हा बाळ झाले तेव्हा त्याला पाहण्यापासून रोखले. वैष्णवीला घरातून हकलून देण्याची धमकी देखील दिली होती. दिला बाहेर उन्हात उभे केले होते अन् आमचे बाळ आम्हाला दे आणि तू माहेरी निघून जा असे तिला सांगितले होते. हगवणे कुटंबीय क्रूर आहेत ते स्वतःच्या मुलाचे नाही झाले.

...तर मी देखील जिवंत नसते

सासरे, सासू आणि नणंद, दीर आपला छळ करत होता. मात्र मी त्यांना उत्तर देत होते. या छळाला कंटाळून पोलिसांमध्ये देखील तक्रार मी दिली होती. वैष्णवी ही शांत होती. ती कदाचित बाहेर पडली असती तर जिवंत असती.मला दीड वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याने माझ्या माहेरी आणून सोडले जर मी तेथे असते तर मी देखील जिवंत नसते, असे मयूर यांनी सांगितले.

Mayuri Hagwane speaks out on the cruelty she allegedly faced from Rajendra and Shashank Hagwane.
Vaishnavi Hagwane Case : वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणेंना अजितदादांचा दणका, थेट पक्षातून हकालपट्टी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com