Vasant More On Amol Kolhe : वसंत मोरेंनी खासदार कोल्हेंना खडसावलं; म्हणाले, 'कोणाची झोप कधी उडवायची...'

Amol Kolhe On ShivsenaUBT : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही असे म्हणत मित्र पक्षांच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे.
vasant More on Amol kolhe  .jpg
vasant More on Amol kolhe .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने प्रचंड असा विजय मिळवला तर महाविकास आघाडीतील तिन्ही मित्र पक्षांचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये सार काही अलबेल नसल्याचं सध्या चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत.

तसेच एकमेकांवर जहरी टीकाही करत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांवर टीका केली होती. त्या टीकेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी उत्तर दिले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढतील का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा देखील दिला आहे.

तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील ठाकरेंची शिवसेनासोबत न आल्यास काँग्रेसला घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याची तयारी दर्शवली आहे.

vasant More on Amol kolhe  .jpg
BJP News: मोदी-शाहांनी फडणवीसांच्या 'या' विश्वासू नेत्यावर पुन्हा मोठी जबाबदारी सोपवली

याचदरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही असे म्हणत मित्र पक्षांच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे. तसेच राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस असल्याचे देखील त्यांनी सांगितलं.

अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याबाबत ठाकरेंच्या शिवसेने कडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ठाकरेंच्या सेनेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी देखील याबाबत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी खासदार कोल्हेंना अप्रत्यक्ष ठणकावलं आहे.

vasant More on Amol kolhe  .jpg
Sharad Pawar News : ''महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच, ही एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही''

वसंत मोरे म्हणाले, खासदारसाहेब, जर निवडणूका झाल्यानंतर म्हणत असतील की, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष अजून झोपेतून जागा झाला नाही, तर साहेब एक गोष्ट लक्षात ठेवावी. आम्ही शिवसेना म्हणून चांगले जागे आहोत आणि कोणाची झोप कधी उडवायची आम्हाला चांगले समजते असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच एका जत्रेने देव म्हातारा होत नाही हेदेखील त्यांनी कोल्हेंना सुनावलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com