Raj Thackeray : PM मोदी बाळासाहेबांना भारतरत्न देणार का? राज ठाकरेंची पोस्ट अन् नव्या चर्चेला तोंड फुटणार...

Balasaheb Thackeray : बाळासाहेबांना भारतरत्न मिळाला तर माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Bharatratna Award Announcement : भारतरत्न पुरस्कारांची घोषणा होताच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. यात त्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी राज यांनी केली आहे. याबाबत त्यांची सोशल मीडियावरील पोस्ट आता चर्चेचा विषय ठरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शुक्रवारी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरणसिंग यांच्यासह कृषी शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

दरम्यान, एका वर्षात तीन भारतरत्न पुरस्कार दिले जातात. यंदा मात्र भारतरत्नसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांच्यासह पाच जणांच्या नावांची घोषण करण्यात आलेली आहे. यानंतर राज ठाकरेंनी बाळासाहेबांना हा बहुमान मिळायला हवा होता, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Raj Thackeray
Eknath Shinde Birthday : भाजपला वैतागून एकनाथ शिंदेंनी भरसभेतच उद्धव ठाकरेंकडे राजीनामा देऊन टाकला...

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, 'माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. या यादीतील एस. स्वामिनाथन यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता,' अशीही अपेक्षा राज यांनी व्यक्त केली.

Raj Thackeray
Baramati Loksabha : बारामतीच्या उमेदवारीचा दौंड राष्ट्रवादीने संपवला सस्पेन्स; अजितदादांच्या निकटवर्तीयाने पटेलांना पाठविले 'हे' नाव

'पी. व्ही. नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणव मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भाजप सरकारने राजकीय औदार्य दाखवले आहे, तर मग हेच औदार्य त्यांनी बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवे,' असेही राज ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाळासाहेबांना भारतरत्न का द्यायला हवा, याचेही कारण त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, 'देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.'

(Edited by Sunil Dhumal)

R

Raj Thackeray
Lok Sabha Election 2024 : नांदेड लोकसभेला महिला मतदारांचा कौल ठरणार महत्त्वाचा ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com