Shrirang Barne In Maval : मावळात तिढा ! बारणेंच्या अडून सामंतांचे थेट अजितदादा अन् फडणवीसांना आव्हान

Uday Samant : जातीय तेढ निर्माण करू नका; सामंतांचे भुजबळ आणि जरांगेंना आवाहन
Shrirang Barne, Uday Samant
Shrirang Barne, Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर या वेळी महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. या कठीण प्रसंगात स्वत:च आपली उमेदवारी जाहीर केलेले शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंच्या मदतीला उद्योगमंत्री उदय सामंत धावून आले. त्यांनी मावळातून या वेळीही बारणेच उमेदवार असतील, असे सांगत त्यांनी व कोणीही चिंता करण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले.

सामंतांनी पिंपरीत शुक्रवारी बारणेंची उमेदवारी आपल्या पातळीवर निश्चित केली. परिणामी माळातून दावा ठोकलेल्या राष्ट्रवादीसह (अजित पवार गट), तर भाजपलाही त्यांनी आव्हान दिले. दुसरीकडे त्यातून उमेदवारीच्या या रस्सीखेचमध्ये बारणेंना मात्र बळ मिळाले आहे. कारण त्यांनी मीच उमेदवार राहणार आहे, असे यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे.

Shrirang Barne, Uday Samant
Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीची तोडफोड; काळे फासण्याचा डाव ?

महायुतीतील राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनीही मावळवर दावा ठोकला. तसेच युतीतील भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनीही तयारी दर्शवली होती. त्यामुळे निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मावळबाबत युतीत उमेदवारीचा तिढा निर्माण झाला.अशा संकटकाळात बारणेंना सामंतांनी हात दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सध्या मराठा आरक्षणावरून राज्यात मराठा आणि ओबीसीत त्यातही त्यांच्या नेत्यांत संघर्ष सुरू आहे. त्यावरून सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी टिकेल असे मराठा आरक्षण देण्याचा शब्द दिल्याने जातीय तेढ निर्माण करू नये, असे सल्लेवजा आवाहन या दोन्ही बाजूंना केले.

राजकारणात भुजबळांएवढा मला अनुभव नसला तरी राज्यात राजकीय तेढ निर्माण होणार नाही, याची दक्षता दोन्ही बाजूंनी घेतली गेली पाहिजे, असे सामंत म्हणाले. सामंतांनी भुजबळांसह मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनाही चिमटा काढला. राज्याला मोठी राजकीय संस्कृती असून, तिचे पालन माझ्यासकट सर्वांनी केले पाहिजे, असे ते म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Shrirang Barne, Uday Samant
Ncp Crisis : अजित पवार गटाने एक-एक करत जितेंद्र आव्हाडांची सगळी प्रकरणंच बाहेर काढली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com