Vijay Wadettiwar On Porsche Accident : तर आरोपी पुण्याच्या रस्त्यावर पुन्हा पैसा आणि राजकीय ताकदची मस्ती दाखवेल !

Pune Porsche Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणात हस्तक्षेप करून राजकीय दबाव आणणाऱ्या आमदाराबाबत पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे? आमदारावर कधी कारवाई होणार? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Porsche Accident News : कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये शनिवारी नव्याने एक अटक करण्यात आली. पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीचे वडील, आजोबा यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता या अल्पवयीन मुलाच्या आईला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र या अटकेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या कारवाई वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने ससून मधील डॉक्टरांनी बदलले असल्याचे तपासात समोर आले आहे. या सर्व घडामोडींमध्ये अल्पवयीन आईचा देखील सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे चौकशीसाठी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल यांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. या अल्पवयीन आरोपीची आणि त्याच्या आईची बालसुधारगृहात समोरासमोर चौकशी देखील करण्यात आली आहे. यातून पोलिसांच्या हाती आणखी सबळ पुरावे लागतील, असा पोलिसांना विश्वास आहे.

या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक करण्यासाठी पोलिसांना इतका दिवस का लागला ? यावरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील आपल्या एक्स या प्लॅटफॉर्म वर पोस्ट केली आहे. यामधून वडेट्टीवार यांनी काही प्रश्न पोलिसांना विचारले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा

Vijay Wadettiwar
Pune Porsche Accident : पोर्श कार अपघात प्रकरणात अजितदादांचा पोलिस आयुक्तांना फोन? स्वतःच दिले उत्तर

वडेट्टीवार म्हणतात, पुणे हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपीच्या आईला अखेर इतक्या दिवसांनी पोलिसांकडून (Police) अटक करण्यात आली.या प्रकरणात किती तत्परतेने कारवाई होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. सदर प्रकरणात हस्तक्षेप करून राजकीय दबाव आणणाऱ्या आमदाराबाबत पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे? आमदारावर कधी कारवाई होणार? असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

Vijay Wadettiwar
Pune Porsche Accident : वडील, आजोबानंतर आता अल्पवयीन मुलाच्या आईला पोलिसांकडून अटक, कारण काय?

या अपघाताच्या निमित्ताने असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. म्हणूनच या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली, तरच सर्व आरोपींना कठोर शिक्षा होवू शकेल.अशी मागणी त्यांनी केली आहे. नाही तर सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे लवकरच हे सर्व आरोपी पुण्याच्या रस्त्यावर पुन्हा पैसा आणि राजकीय ताकद ची मस्ती दाखवण्यात मोकळे होतील, अशी भीती देखील विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Vijay Wadettiwar
Rohit Pawar News : 'RTO' ने डोळे मिटून दूध पिलं तर 'एक्साईज' विभाग नशेत, किडलेल्या व्यवस्थेला बायपास 'सर्जरी'ची आवश्यकता; रोहित पवारांचा निशाणा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com