Nala Sopara News : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता मतदानापूर्वी काही नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. काल रात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला असेल त्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या कंपन्यांवर पोलिसांनी केलेलं सर्च ऑपरेशन असेल. यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेल्या विनोद तावडे यांच्यावरती पैसे वाटल्याचा आरोप होत आहे.
या संदर्भातील एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यावरून आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणांमध्ये वेगळा संशय व्यक्त केला आहे. हा संशय व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर नाव न घेता निशाणा साधण्यात आला आहे.
विरारमध्ये भाजपाकडून पैसे वाटप करण्यात येत आल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या माध्यमातून हे पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
या प्रकरणांमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे (Vinod Tawade) यांना विरार पूर्व येथील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला असून तुम्ही आमच्या मतदारसंघात कशासाठी आलात? असा जाब विचारण्यात येत असून मोठा राडा त्या ठिकाणी सुरू असल्याचा दिसून येत आहे. विनोद तावडे हे हॉटेलमध्ये असताना हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हा सगळा राडा झाल्याचं समजला आहे.
यादरम्यान क्षितिज ठाकूर यांच्या हाती डायरी लागली असून. या डायरीत 15 कोटी रुपयांच्या वाटपा संदर्भातील नोंदी असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. आरोप- प्रत्यारोप सुरू झाले असून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडिया वरती पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले, विरार’मध्ये तावडेंच्या स्वाक्षरीने भाजपच्या ‘परतीचा करार’ पक्का झाला आहे. मात्र
विरारची ही टीप 'सागर'वरून तर देण्यात आली नाही ना? सवाल उपस्थित करत रोहित पवार यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात देखील फुलाच्या आशीर्वादाने असेच प्रकार सुरू असल्याचं सांगितला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.