
Nagpur Congress: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच जाहीर केली. या कार्याकारिणीत नागपूरसह विदर्भातील नेत्यांनी आपले वर्चस्व राखले असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या टीममध्ये नागपूरमधील तीन युवा नेत्यांचा समावेश केला आहे. त्यांना थेट महासचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांचे चिरंजीव केतन ठाकरे युवक काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यांना आता थेट प्रदेश कार्यकारिणीत महासचिव म्हणून उडी घेतली आहे. त्यांच्यासोबत माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र व प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत तसेच माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांचे चिरंजीव याज्ञवल्क्य जिचकार यांचाही समावेश महासचिव म्हणून करण्यात आला आहे.
कुणाल राऊत यांनी रामटेक लोकसभेची उमेदवारी मागितली होती. एवढेच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकीत भंडारा विधानसभा मतदारसंघावर त्यांनी दावा केला होता. याज्ञवल्क्य जिचकार यांनी काटोल विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, ही जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यामुळे जिचकार यांनी बंडखोरी केली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या विरुद्ध ते निवडणूक लढले होते. महिनाभरापूर्वी त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते.
विदर्भातील माजी मंत्री अनिस अहमद, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार अभिजित वंजारी तसेच माजी मंत्री, डॉ. सुनील देशमुख आणि माजी मंत्री रणजित कांबळे, माजी आमदार वजाहत मिर्झा, माजी आमदार गोपाल अग्रवाल यांना पदोन्नती देऊन वरिष्ठ उपाध्यक्ष करण्यात आले आहेत. या यादीत नाना गावंडे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे.
उपाध्यक्षांमध्ये माजी आमदार अशोक धवड, किशोर कन्हेरे, सुरेश भोयर, तक्षशिला वाघधरे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विशाल मुत्तेमवार यांचा समावेश करण्यात आला आहे. महासचिव म्हणून अभिजीत सपकाळ, अतुल कोटेचा, सतीश वारजूरकर, गिरीश पांडव, हैदरअली दोसानी, केतन ठाकरे, कुणाल राऊत, कुंदा राऊत, नंदा पराते, प्रसन्न तिडके, रवींद्र दरेकर, संदेश सिंगलकर, संजय दुबे, शकूर नगानी, अमाकांत अग्नीहोत्री, याज्ञवल्क्य जिचकार, झिया पटेल तर सचिव म्हणून अवंतिका लेकुरवाळे, जयंत दळवी, नाना कंभाले, नयना झाडे, प्रकाश वसू, आर. एम. खान नायडू, सुरेश जग्यासी यांचा समावेश करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.