आमदार मित्रासाठी वडगाव शेरीतील वाडिया ग्रुप  'इन ॲक्शन मोड'   

आमदार जगदीश मुळीक यांचे शिक्षण वाडिया महाविद्यालय येथे झाले आहे. लाघवी आणि प्रेमळ स्वभावामुळेमहाविद्यालय जीवनापासूनच त्यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे. एरवी या ग्रुप मधील बरेचजण विविध पक्षांचे पदाधिकारी म्हणून काम करतात. परंतु 'दोस्ती के लिए कुछ भी'... असे म्हणत निवडणूक आल्यावर मात्र आपला पक्ष आणि आपले पद विसरून सगळे जगदीश मुळीक यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहतात, असा अनुभव यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी घेतला आहे.
BJP Mla Jagdish Mulik
BJP Mla Jagdish Mulik
Published on
Updated on

वडगाव शेरी (पुणे)  : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये वाडिया कॉलेज ग्रुप नावाच्या मित्र परिवाराची ताकद मोठी आहे. आमदार जगदीश मुळीक हे सुद्धा वाडिया ग्रुपचे सदस्य आहेत. त्यामुळे आपल्या ग्रुपमधील या मित्राला पुन्हा आमदार करण्यासाठी वाडिया ग्रुप आता 'ॲक्शन मोडमध्ये' आला असून चांगल्या प्रकारे सक्रिय झाला आहे. 'दोस्ति के लिए कुछ भी' असे म्हणत मित्राला आमदार करण्यासोबत मंत्री म्हणून पाहण्याची या ग्रुपची इच्छा आहे. त्यामुळे ग्रुपच्या सदस्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.

आमदार जगदीश मुळीक यांचे शिक्षण वाडिया महाविद्यालय येथे झाले आहे. लाघवी आणि प्रेमळ स्वभावामुळे  महाविद्यालय जीवनापासूनच त्यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे. एरवी या ग्रुप मधील बरेचजण विविध पक्षांचे पदाधिकारी म्हणून काम करतात. परंतु 'दोस्ती के लिए कुछ भी'... असे म्हणत निवडणूक आल्यावर मात्र आपला पक्ष आणि आपले पद विसरून सगळे जगदीश मुळीक यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहतात, असा अनुभव यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी घेतला आहे.

कारण कुठलीही कामगिरी फत्ते करताना आपल्यासोबत मित्र असेल तर ते काम खूप सोपे होते; आणि  आपला आत्मविश्वास वाढतो असा अनुभव प्रत्येकाला जीवनात येत असतो. त्यामुळे ऑल टाईम फेव्हरेट असणारे जगदीश भाऊ आपल्या दोस्तांसोबत आणखी जोमाने प्रचाराला लागले आहेत.

विरोधी पक्षातील आणि नगर रस्ता परिसरातील अनेक मातब्बर मंडळी वाडिया कॉलेजला शिकली आहेत. त्यामुळे ग्रुपच्या मंडळींनी वाडिया कॉलेजचा माजी विद्यार्थी म्हणून मुत्सद्दीपणाने अशा मंडळींशी संपर्क साधने सुरू केले आहे.आमदारांनी सुद्धा वाडिया कॉलेज ग्रुप सोबत राहत मैत्रीमध्ये कधी अंतर पडू दिले नाही. त्यामुळेच वाडीया ग्रुपमधील सगळे मित्र आपापले पक्षभेद विसरून जगदीश मुळीक यांच्यासाठी काम करताना दिसत आहेत.

राजकारणातील व्यस्त  दिनक्रम बाजूला ठेवून इतरवेळी मित्रांसोबत निसर्गात भटकंती, भारतभ्रमण, मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणे, सुखदुःखात आणि वैयक्तिक अडचणीत धावून जाणे अशा मुळीक यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे त्यांचा मित्रपरिवारही त्यांना मंत्रिपदावर पाहू इच्छितो. अशा आशयाच्या पोस्ट त्यांचा मित्रपरिवार सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवत असल्याचा अनुभव वडगाव शेरी येथील नागरिक घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com