Walmik Karad Inquiry Case : मोठी बातमी! वाल्मिक कराड प्रकरणात भाजपच्या पुण्यातील 'या' बड्या नेत्याची 'सीआयडी'कडून चौकशी

Santosh Deshmukh Murder Case CID Investigation : वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला (CID) संशय आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस कराड यांच्याशी संबंधित असलेल्या महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात सीआयडी कडून चौकशी करण्यात येत आहे.
Walmik Karad   .jpg
Walmik Karad .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर कराडने एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीला सरेंडर केलं आहे. यानंतर वाल्मिक कराडबाबतच्या (Walmik Karad) सगळ्या बाबींची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात येत आहेत. आता या चौकशीसंबंधातील नवी अपडेट समोर आली आहे.

यामध्ये वाल्मिक कराड याने पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला (CID) संशय आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये दोन ऑफिस कराड यांच्याशी संबंधित असलेल्या महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात सीआयडी कडून चौकशी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पुण्यातील एका भाजपच्या माजी नगरसेवकाची चौकशी सीआयडीने केली आहे.

वाल्मिक कराडप्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची आज सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. पुण्यात वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली. या या खरेदीमध्ये खाडेंनी मध्यस्थी केला असल्याचा संशय सीआयडीला आहे. या संशय असल्याच्या पार्श्वभूमीवरती दत्ता खाडे यांची सीआयडीने चौकशी केली असल्याचं बोललं जात आहे.

Walmik Karad   .jpg
Uday Samant Video : भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पाडली फूट? उदय सामंतांनी 'त्या' दाव्याची सत्यता सांगितली

काही वेळापूर्वीच ही चौकशी संपली असून खाडे पुण्याला यायला निघालेत. वाल्मिक कराडचे पुण्यातील फर्गुसन महाविद्यालयाच्या समोर उभ्या रहात असलेल्या इमारतीत दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे दोन ऑफीस स्पेसेस खरेदी केलीत. खाडेंच्या मध्यस्थीने हा व्यवहार झाल्याचा संशय आहे. दत्ता खाडे हे गोपीनाथ मुंडेंपासून वाल्मिक कराडला ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे.

Walmik Karad   .jpg
Ajit Pawar News : बीडचे पालकमंत्री का झालात ? अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले!

'माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते, तेव्हा कराडशी...'

वाल्मिक कराडचे संबंध असल्याचा संशय सीआयडीला होता. म्हणून आज त्यांनी मला चौकशीला बोलावलं होतं. माझी चौकशी झाली, मी जी काही उत्तर द्यायची आहेत, ती दिली आहेत. माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते, तेव्हा माझी कराडशी तोंड ओळख आहे.वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही. माझी चौकशी झाली, मी सीआयडीला सहकार्य केलं आहे, असं खाडे म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com