Sharad Pawar : मुख्यमंत्री फडणवीसांना शरद पवारांचा फोन; परभणीतील परिस्थितीचं गांभीर्य एका वाक्यात सांगितलं

Pune Sharad Pawar CM Devendra Fadnavis Parbhani violence incident : शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत, परभणीतील घटनेच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे.
Sharad Pawar 3
Sharad Pawar 3Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात आयोजित केलेल्या भीमथडी जत्रेला भेट दिली. यावेळी भीमथडी जत्रे लावण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी करताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला.

साधारण, दोघांमध्ये एक मिनिट फोनवर बोलणं झालं. त्यामुळे उपस्थितीना नेमकं शरद पवारांनी कोणत्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना फोन लावला याबाबत उत्सुकता लागली होती. याबाबत शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना खुलासा केला आहे.

खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे काल परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्याचबरोबर संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना झाली, त्या पुतळा परिसराला देखील भेट दिली.

Sharad Pawar 3
Parbhani Somnath Suryavanshi death case : परभणी दौऱ्यापूर्वीच राहुल गांधींवर भाजपचा 'निशाणा'; बावनकुळे म्हणताय, 'राजकारणासाठी नौटंकी...'

यानंतर शरद यांनी घडलेला प्रकार गंभीर असून या सर्व प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितलं होतं. आज शरद पवार पुणे (Pune) दौऱ्यावर असताना या दौऱ्यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि याबाबत देखील संवाद साधला.

Sharad Pawar 3
Local Bodies Election : भाजप महाअधिवेशनातून 'स्थानिक'च्या निवडणुकीचा शंखनाद करणार

फोनवर झालेल्या संवादाबाबत विचारलं, असता शरद पवार म्हणाले, "यंदाचे साहित्य संमेलन दिल्लीला आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला त्यांनी यावं सर्व मराठी भाषिकांची आणि साहित्यिकांची अपेक्षा आहे. यानुसार मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं असून ते त्यांनी स्वीकारला आहे. 21 फेब्रुवारीला दुपारी चार वाजता हे साहित्य संमेलन सुरू होणार असून ते पुढील तीन दिवस चालणार आहे".

शरद पवारांनी परभणीचा दौरा केल्यानंतर याबाबत मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना इतकच सांगितलं की, स्थिती फार गंभीर आहे. त्यामुळे त्याची नोंद तातडीने आणि गांभीर्याने घेणे आवश्यक आहे".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com