कॉंग्रेस भवनात अनेक वर्षांनी घुमला शिट्टया आणि टाळ्यांचा आवाज

लोकशाही बचाव सभेच्या निमित्ताने कन्हैयाकुमार यांची सभा आज कॉंग्रेस भवनाच्या आवारात झाली.
कन्हैयाकुमार
कन्हैयाकुमारसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : गेल्या काही वर्षांपासून फारशी वर्दळ नसलेल्या पुण्याच्या कॉंग्रेस भवनात कॉंग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार यांच्या सभेच्या निमित्ताने आज अनेक वर्षांनी शिट्टया आणि टाळ्यांचा आवाज घुमला.सभेच्या निमित्ताने कॉंग्रेस भवनात झालेली गर्दी पक्ष संघटनेत चैतन्य निर्माण करणारी ठरली.

कन्हैयाकुमार
मोदींना पर्यायावर कन्हैयाकुमार म्हणाले; आजाराला पर्याय नसतो त्यावर इलाज करतात

लोकशाही बचाव सभेच्या निमित्ताने कन्हैयाकुमार यांची सभा आज कॉंग्रेस भवनाच्या आवारात झाली.सकाळपासूनच भवनाच्या आवारात सभेचे वातावरण तयार करण्यात आले होते. शहराच्या विविध भागातून आलेल्या तरूणांची संख्या यात अधिक होती. सभेला मिळालेला प्रतिसाद त्यातही कन्हैयाकुमार यांच्या भाषणाला तरूणांचा मिळालेला प्रतिसाद कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करणारा होता.विद्यार्थी नेता असलेल्या कन्हैयाकुमार यांनी काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता.

कन्हैयाकुमार
स्वातंत्र्य तर संघर्षातून मिळाले; भीक म्हणून मिळाल्या असतील तर त्या पदव्या आणि पुरस्कार

हिंदी भाषेवरील उत्तम पकड, राजकीय संदर्भ आणि ऐतिहासिक दाखले देत ऐकणारांची मने जिंकण्याची वेगळी कला कन्हैयाकुमार यांनी साधल्याने त्यांच्या भाषणाला तरूणांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.जबरदस्त वक्तृत्व असलेल्या कन्हैयाकुमार यांना येत्या काळात कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून देशभर फिरविले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रान उठविण्यासाठी कन्हैयाकुमार अत्यंत चांगला आणि प्रभावी चेहरा कॉंग्रेसला गवसला आहे. त्याची पचिती आज पुण्याच्या कॉग्रेस भवनात आली.

जेनयूमधला डाव्या विचाराचा विद्यार्थी नेता ते कॉंग्रेसचा युवा नेता हा कन्हैयाकुमार यांचा प्रवास देशातील राजकीय उलथापालथीमधला महत्वाचा टप्पा आहे. कॉंग्रेसमध्ये येण्याआधी गेल्या लोकसभेत त्यांनी बिहारमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून निवडणूक लढविली. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावाला लागला.दरम्यानच्या काळात त्यांचा राहूल गांधींशी संपर्क आला. गांधी यांच्या आग्रहाने त्यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com