
Vaishnavi Hagwane case update : वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. तिला हुंड्यासाठी छळणाऱ्या हगवणे कुटुंबातील सर्वांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता, पती शशांक, दीर सुशील आणि नणंद करिश्मा या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय नणंद करिश्माचा मित्र निलेश चव्हाण यालाही अटक केली आहे.
पण या प्रकरणात सर्वाधिक चर्चा होत आहे ती वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे हिची. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी हिनेही करिश्मा आणि सासू या दोघी छळ करायच्या, करिश्मानेच सर्वाधिक त्रास दिला, असा आरोप केला आहे. त्यामुळे ही करिश्मा नेमकी काय करायची? हगवणे कुटुंबात तिचा किती दरारा होता हेच आपण बघणार आहोत...
राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे यांना तीन अपत्य. यातील पहिलेच अपत्य म्हणजे करिश्मा होय. ती 34 वर्षांची होती आणि अविवाहित होती. मुळशी तालुक्यात तिची 'पिंकीताई' म्हणून ओळख आहे. ती स्वतःला एक फॅशन डिझायनर म्हणवते. 'लक्ष्मीतारा' या नावाने तिने स्वतःचे शोरुम सुरू केले आहे.
तिचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असताना करिश्मा आंदोलनांमध्ये असायची. शरद पवार, सुप्रिया सुळे, आदिती तटकरे, रुपाली चाकणकर अशा नेत्यांसोबत तिचे फोटोही आहेत. त्यातून 'लक्ष्मीतारा' शोरुमच्या उद्घाटनाला सुनेत्रा पवारांना बोलावले होते. सुप्रिया सुळे यांनाही आमंत्रण होते, परंतु त्या काही कारणास्तव आल्या नाहीत.
हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरीच्या म्हणण्यानुसार, करिश्मा घरातली मोठी असल्याने आई-वडिलांची प्रचंड लाडकी आहे. त्यामुळे करिश्मा म्हणेल ती प्रत्येक गोष्ट आई-वडील ऐकत होते. दोन्ही भावांवरही करिश्माचा दबाव होता. सासू आणि सासरे करिश्माच्या सांगण्यानुसार वागत असत. संपूर्ण कुटुंबावर तिची सत्ता होती. घरातील सर्व निर्णय तिच्या हाती होते. घरात कोणाशी कसे वागायचे हे तीच ठरवायची.
वैष्णवी आणि मी एकाच छताखाली राहत असूनही करिश्माने एकमेकींशी बोलयला आणि भेटयला मनाई केली होती. करिश्मानेच अनेकदा करिश्माने घाणेरड्या शिव्या देत मारहाण केली होती. त्यामुळे या प्रकरणी तक्रार दाखल केली आणि हगवणे कुटुंबाला सोडून मयुरी माहेरी आली. मयुरी या जाचातून निसटली, पण करिश्माने हेच वैष्णवीसोबत केले.
वैष्णवीला घालूनपाडून बोलणे, शिवीगाळ करणे, आईसोबत मिळून मारहाण करणे, असे प्रकार ती करत होती. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले, गरोदर असताना उन्हात उभे केले, तिला त्रास दिला असा आरोप आहे. तिच्या अंगावर थुंकत तिला मारहाण केली. नंतर माहेरी मारत आणून सोडले. माहेरी आणतानाही गाडीत वैष्णवीला मारहाण केली.
वैष्णवीच्या आत्महत्येवेळी तिचे शरीर मारहाणीमुळे पूर्ण काळानिळे पडले होते. त्यामुळे तिला मारहाण झाली असावी, असा दाट संशय आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे दहा महिन्यांचे बाळ ज्या निलेश चव्हाणकडे ठेवले होते, तो निलेशही करिश्माचाच मित्र आहे. त्याचेही अनेक कारनामे समोर आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.