Vaishnavi Hagawane Breaking : सर्वात मोठी बातमी, अखेर सात दिवसांनंतर वैष्णवीचे फरार सासरे राजेंद्र हगवणे आणि दीराला अटक

Vaishnavi Hagawane News : राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुक्यातील पदाधिकारी आहेत, राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांना अटक होत नाही का? अशी ही चर्चा सध्या शहर परिसरात जोर धरु लागली होती. त्यामुळे पोलिसांवरील दबावही वाढत चालला होता.
Vaishnavi Hagvane and Rajendra Hagvane .jpg
Vaishnavi Hagvane and Rajendra Hagvane .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.अशातच आता अखेर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे याला पोलिसांनी सात दिवसानंतर अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना तळेगाव परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे पोलिसांनी फरार असलेल्या सासरे राजेंद्र हगवणे आणि थोरला दीर सुशील हगवणेच्या शोधासाठी वेगानं चक्र फिरवली होती. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.सुरुवातीला वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा मिळाल्यामुळे या प्रकरणात पोलिसांचा संशय बळावला होता.

याचवेळी वैष्णवीच्या वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagwane) आई-वडिलांनी तिचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप करुन तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.पुणे पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक,नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांना यापूर्वीच बेड्या ठोकल्या होत्या.

आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी शुक्रवारी (ता.23) पहाटे अटक करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार होते. तसेच पिंपरीतील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येला सहा दिवस उलटलेत, तरी अद्याप पुण्यातील मुळशीचे राजेंद्र हगवणेंना अटक का होत नाही? असा  सवाल उपस्थित केला जात होता.

Vaishnavi Hagvane and Rajendra Hagvane .jpg
Anjali Damania: अंजली दमानियांचा वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात मोठा दावा; 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या 'आयजीं'चं नाव घेत म्हणाल्या....

राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे मुळशी तालुक्यातील पदाधिकारी आहेत, राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांना अटक होत नाही का? अशी ही चर्चा सध्या शहर परिसरात जोर धरु लागली होती. त्यामुळे पोलिसांवरील दबावही वाढत चालला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा संशयास्पद मृत्यूमुळे आरो-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं होतं. तसेच अजित पवारांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्याच टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर रोखठोक उत्तर दिलं होतं.

Vaishnavi Hagvane and Rajendra Hagvane .jpg
Vaishnavi Hagavne : हगवणेंच्या सुनांवर निलेश चव्हाणचीही दादागिरी...बाळही होते त्याच्याकडेच; मोठ्या सुनेनं सांगितली छळाची कहाणी

बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, कार्यकर्ते म्हणून अनेक जण लग्नाला बोलावत असतात. शक्य असेल त्या लग्नाला मी जातो. मात्र, लग्नानंतर जर त्यांनी सुनेबद्दल वेडेवाकडं केलं, तर त्याला अजित पवार कसा जबाबदार असेल, सवाल त्यांनी केला आहे.

ही घटना घडल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तांना फोन करून दोषींवर कडक कारवाई करण्यास सांगितले आहे, त्यामुळे आत्महत्या केलेल्या वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद पोलिस कोठडीत आहेत. सासरा आणि दीर फरारी आहेत. मात्र, पळून पळून ते कुठे जाणार आहेत. मी पोलिसांना सांगितलं आहे की, तीन नाही तर सहा टीम करा. पण, जिथं असेल तिथून त्यांच्या मुसक्या आवळून आणा, असा सूचना मी पोलिसांना दिल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com