Satyapal Malik on Maharashtra Politics: महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीचे मास्टरमाईंड कोण ? सत्यपाल मलिक स्पष्टच बोलले....

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर सत्यपाल मलिक यांनी भाष्य केलं आहे.
Satyapal Malik on Maharashtra Politics:
Satyapal Malik on Maharashtra Politics: Sarkarnama
Published on
Updated on

Satyapal Malik on Maharashtra Politics: राजकीय पक्ष फोडण्याचा मास्टरमाइंड हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. असा धक्कादायक दावा जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. गेल्या एक वर्षात महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन स्थानिक पक्षात मोठी फूट पडली. एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० आमदारांसह बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊन अवघे दोन दिवस झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील आपल्या ४० समर्थक आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सामील झाले.

महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर सत्यपाल मलिक यांनी एक युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले गेले. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून या फोडाफोडी केली जाते याचा जनक कोण आहे. कोण करतय हे सगळ? या प्रश्नाला उत्तर देताना सत्यपाल मलिक म्हणाले, या फोडाफोडीचे जनक दुसरे तिसरे कोणी नसुन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे फक्त मध्यस्थी असतात, पण कोणाला वाचवायचं कोणाला बरबाद करायंच, कोणला धमकवायं, हे सर्व नरेंद्र मोदीच ठरवतात. त्याच्याच सांगण्यानुसार चौकश्या लावल्या जातात.

Satyapal Malik on Maharashtra Politics:
Congress Vs RSS : माजी मुख्यंत्र्यांवर एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल; काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्रात आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ताकद कमी झाली आहे का, आता या दोन पक्षांचं भविष्य काय असेल, या प्रश्नाला उत्तर देताना मलिक म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघेही या संकटातून बाहेर पडतील. राष्ट्रवादीच्या मतदार शरद पवार यांच्या बाजूने जातील आणि शिवसेनेचे मतदार उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा देतील. कारण आता लोकांनाही या गोष्टी समजू लागल्या आहेत.

हे आरोप तुम्ही कोणत्या बेसवर करताय, याला उत्तर देताना मलिक म्हणाले, मला या सर्व गोष्टी माहित आहेत. या सर्व गोष्टी मी स्वत: भोगत आहे. माझी सुरक्षा काढून घेण्यात आली. चारही बाजूने मला त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. दे दुसरा तिसा कोणी करत नाहीये, की दुसऱ्या कोणाशी माझं वैयक्तिक मतभेदही नाही. फक्त आणि फक्त पंतप्रधानच हे करत आहेत.

२७ जूनला नरेंद्र मोदींनी मध्यप्रदेशात एका सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. पण त्यानंतर अगदी तीन-चार दिवसातच अजित पवार भाजपमध्ये सामील झाले. चार दिवासंपूर्वी नरेंद्र मोदी ज्या व्यक्तीला तुरुंगात पाठवण्याची भाषा करत होते, त्याच व्यक्तीने त्यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही कोणत्या प्रकारची कारवाई आहे. यावर बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले की, ही कोणतीही कारवाई नव्हती. हा फक्त ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता. एकतर आमच्यात सामील व्हा किंवा आम्ही तुमच्यावर कारवाई करु.

Satyapal Malik on Maharashtra Politics:
Thackeray-Shinde Politics : उद्धव ठाकरे आज कुणावर तोंडसुख घेणार ?

"भ्रष्टाचारात जे लोक सामील आहेत त्यांना आपल्या पक्षात सामील करुन घेणे आणि त्यांचे पक्ष फोडणे, ते पक्ष संपवून टाकणे, हाच नरेंद्र मोदींचा विचार असल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराचा कसलाही तिरस्कार नाही. त्या व्यक्तीवर चौकशा कारवाया करुन त्या व्यक्तीला संपवून टाकलं जात आणि पुन्हा त्यांच्याच पक्षात सामील करुन घेतलं जात. नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराचा तिरस्कार असता तर गोव्यात राज्यपाल असताना मी ज्यांची तक्रार त्यांच्याकडे केली होती, त्यांच्यावर कारवाई झाली असती. पण त्यांनी मलाच मेघालयमध्ये पाठवून दिलं. अशी खंतही सत्यपाल मलिक यांनी यावेळी व्यक्त केली. मी ज्यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यांना आजपर्यंत एकदाही चौकशीला बोलवण्यात आलं नाही. त्यांचं एक विचित्रच वागणं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com