Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना मोठा झटका; बीडच्या राजकारणात फेरबदल, बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Beed politics update News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरु असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Beed News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरु असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बीडची विधानसभा निवडणूक लढवलेले डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे उपस्थितीत होत्या. डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या प्रवेशाने बीडमध्ये आता भाजपला बळ मिळणार आहे.

रविवारी सकाळी योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने रवाना झाले होते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी शनिवारी राजीनामा दिला यानंतर रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात स्थानिक पातळीवर कुठल्याच निर्णय प्रक्रियेत आपल्याला घेतलं जात नसल्याची नाराजी व्यक्त केली होती.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
BJP Politics: सावरकरांच्या जन्मभूमीत भाजपला सत्ता तर दूर, निवडणुकीत कोंडी होण्याची शक्यताच अधिक, काय आहे कारण?

यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले होते. रविवारी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे उपस्थितीत होत्या. डॉ. क्षीरसागर यांच्या प्रवेशाने येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत चित्र बदलणार आहे. त्यांच्या प्रवेशाने बीडमध्ये आता भाजपला मोठी ताकद मिळणार आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : स्थानिक पातळीवरील युतीबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले,'उद्यापर्यंत निर्णय...'

वर्षभरापूर्वी झालेली बीडची विधानसभा निवडणूक डॉ. योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या पक्षाकडून लढवताना लक्षवेधी मते मिळवली होती. मात्र, गेल्या काही दिवसापासून त्यांना निर्णय प्रक्रियेतून डावलले जात होते. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजीचा उद्रेक; जुन्नरच्या नगराध्यक्षपद उमेदवारीचा वाद ‘मातोश्री’वर, संपर्कप्रमुखांनी बोलावली बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात योगेश क्षीरसागर यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला बीडमध्ये चांगला चेहरा आणि बळ मिळण्याची शक्यता मानली जात आहे. पक्षाचे काही व डॉ. क्षीरसागरांचे अशी गोळाबेरीज करुन पक्ष सर्व जागा लढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात बीड नागरपालिका निवडणुकीत रंगत येणार आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षाकडे इच्छुकांच्या रांगा, पहिल्याच दिवशी अर्ज संपले, 10 हजार घेऊन...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com