Pune News : यशवंत साखर कारखाना निवडणूक; रयत व शेतकरी पॅनेलमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी

Yashwant Sugar Factory Election यशवंत साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोचला असून, नऊ मार्चला कारखान्यासाठी मतदान होत आहे.
Yashwant Sugar Factory Election
Yashwant Sugar Factory Electionsarkarnama
Published on
Updated on

- कृष्णकांत कोबल

Manjari News : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोचला आहे. कार्यक्षेत्रातील गावागावांत प्रचार सभांनी वातावरण तापविले असून, अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी अशा दोन्ही परस्पर विरोधी पॅनेलकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

यशवंत साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सध्या प्रचार शिगेला पोचला असून, नऊ मार्चला कारखान्यासाठी मतदान होत आहे. सध्या कार्यक्षेत्रातील गावोगावी फिरून सर्वच उमेदवार मतदानाचे आवाहन करत आहेत. त्यासाठी कोपरा सभा, बैठकांच्या माध्यमातून अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेल विरुद्ध अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीत जोरदार लढत होत आहे.

सोरतापवाडी येथे झालेल्या अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेलच्या कोपरा सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी विरोधी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीवर घणाघाती हल्ला चढविला. सुदर्शन चौधरी म्हणाले, शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारी मंडळी शेतकरी विकास आघाडीत शिरली आहेत. त्यांनी कायम शेतकरीविरोधी भूमिका घेतली आहे. हीच मंडळी आता आम्हीच कारखाना सुरू करूच्या वल्गना करीत आहेत. मुळात ही शेतकरी विकास आघाडी नसून व्यापारी विकास आघाडी आहे.

Yashwant Sugar Factory Election
Yashwant Sugar Factory Election : 'यशवंत'च्या निवडणुकीत 'किटली' विरुद्ध 'कपबशी' लढत रंगणार!

दरम्यान, सोरतापवाडी याच गावात अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीनेही कोपरा सभा घेत रयत सहकार पॅनेलचा खरपूस समाचार घेतला. कारखान्याचे विद्यमान संचालक प्रकाश जगताप म्हणाले, "मागील तेरा वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात विरोधकांना रसच नाही. कारखान्याची एक इंचही जागा शिल्लक न ठेवता सर्व जागा त्यांच्याच जवळच्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेतकऱ्यांचे हित डोळ्यांसमोर ठेऊन अण्णासाहेब मगर यांनी हा साखर कारखाना उभारला. बंद पडलेला हा कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या विकासाला पुन्हा चालना मिळावी, म्हणून आम्ही सतत पाठपुरावा करत असून, त्यात यश आले आहे. विरोधकांना मागील तेरा वर्षांपासून बंद पडलेला कारखाना सुरू करता आला नाही. यांच्यावर सभासदांनी आता किती विश्वास ठेवायचा. या मंडळींच्या हातात जर कारखाना गेला तर तो विकलाच जाईल, असा घणाघात जगताप यांनी केला.

Edited By : Umesh Bambare

R

Yashwant Sugar Factory Election
Pune News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com