Yogesh Tilekar Won : पुण्यात भाजपाची 'अण्णागिरी', एक अण्णा खासदार तर दुसरे झाले आमदार !

Vidhan Paridhad Election 2024 Results : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक अशी ओळख माजी आमदार योगेश टिळेकर यांची आहे.
Yogesh Tilekar -Devendra Fadnavis-   Muralidhar Mohol
Yogesh Tilekar -Devendra Fadnavis- Muralidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

Pune News : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मुरलीधर मोहोळ उर्फ अण्णा लोकसभेमध्ये खासदारपदी निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ फडणवीस यांच्या मर्जीतील दुसरे अण्णा विधान परिषदेचे आमदार झाले आहेत. त्यामुळे पुण्यात भाजपची 'अण्णागिरी' सुरू आहे असं बोललं जात आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहे. यासाठी आज विधानभवनात सर्वपक्षीय आमदारांनी मतदान केलं असून त्याचा निकाल आता हाती आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडून नव उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपकडून 5, शिवसेना शिंदे गटाकडून 2 आणि अजित पवार गटाकडून 2 तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले आहेत.

विधान परिषद निवडणुकीत विजयी कोटा हा 23 मतांचा निश्चित करण्यात आला होता. यातच सुरूवातीपासून भाजचे योगेश टिळेकर यांनी आघाडी घेतली . योगेश टिळेकर यांनी पहिल्या पसंतीची मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यामुळे योगेश टिळेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिला विजय मिळवला आहे.

विधान परिषदेसाठी योगेश टिळेकर यांच्या डोक्यावर आपला हात कायम ठेवत त्यांच्या नावाला पसंती देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. पक्षाकडून विधानपरिषदेसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असातानाच फडणवीस यांनी हडपसरचे माजी आमदार टिळेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Yogesh Tilekar -Devendra Fadnavis-   Muralidhar Mohol
Rajesh Viteakar Vishleshan : लोकसभेला माघार घेतलेल्या विटेकरांना अजितदादांचे मोठं बक्षीस

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक अशी ओळख माजी आमदार योगेश टिळेकर यांची आहे. दहा वर्षापूर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत टिळेकर यांच्यातील गुण ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून संधी दिली.या मतदारसंघातून ते विजयी झाले होते. या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांचा त्यांनी पराभव केला होता. ही निवडणूक भाजपने स्वबळावर लढविली होती.

मोदी लाटेमध्ये शहरातील आठही मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करणारे योगेश टिळेकर यांच्यासह कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांना संधी देण्यात आली होती. हे दोघे या निवडणुकीत विजयी झाले होते.

हडपसरचे आमदार म्हणून काम करताना टिळेकर यांनी कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोठा पाठपुरावा केला. या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी टिळेकर सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होते. आमदार झाल्यानंतरही फडणवीस यांच्या मर्जीतील असल्याने त्यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती.

आमदार म्हणून काम करताना येवलेवाडीचा विकास आराखडा तयार करताना माजी आमदार टिळेकर यांनी मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत आरक्षण टाकण्यासाठी (डीपी) तसेच काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. डीपीमध्ये आरक्षण टाकण्यासाठी बिल्डरांकडून मोठ्या रकमा तसेच गाड्या देखील घेतल्याचे प्रकरण समोर आले होते.

Yogesh Tilekar -Devendra Fadnavis-   Muralidhar Mohol
Milind Narwekar Victory : उद्धव ठाकरेंचे 'राइट हॅन्ड' अन् 'अजातशत्रू' मिलिंद नार्वेकर विजयी!

कोंढवा परिसरात ऑप्टिक फायबरचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला वारंवार फोन करून 50 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आमदार टिळेकर यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यावर कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्याकडेच गृहखाते होते. टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबधित पोलिस अधिकाऱ्याची बदली देखील गृह विभागाने केल्याने याची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. या प्रकरणानंतरही टिळेकर हे फडणवीस यांच्या 'गुडबुक'मध्येच राहिले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे पुनवर्सन करण्यासाठी त्यांना भाजपच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत त्यांना निरीक्षक म्हणून देखील फडणवीस यांनी जबाबदारी दिली होती. आता विधानपरिषदेसाठी टिळेकर यांच्या डोक्यावर आपला हात कायम ठेवत त्यांच्या नावाला पसंती देण्याचे काम उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

Yogesh Tilekar -Devendra Fadnavis-   Muralidhar Mohol
Sadabhau Khots Victory : देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला, सदाभाऊ दुसऱ्यांदा विधान परिषदेवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com