Pune News पुणे विमानतळावर 'या' भाजप नेत्याला अटक; बॅगेत आढळली काडतूसं, दोन मॅगझिन, संभाजी ब्रिगेडचा गंभीर आरोप

Sambhaji Brigade Allegation : आता या प्रकरणामध्ये संभाजी ब्रिगेडने उडी घेतली असून दीपक काटे हा भाजपचा आणि संभाजी भिडे यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करत ही ओळख लपवली जात असल्याचे सांगितले आहे.
Deepak Kate
Deepak KateSarkarnama
Published on
Updated on

Pune, 06 January : ‘इंडिगो'च्या पुणे-हैदराबाद विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बँगेची लोहगाव विमानतळावर तपासणी करताना 28 जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझिन सापडल्याने खळबळ उडाली. प्रवाशाकडे कोणताही परवाना नसताना विमानातून बेकायदा जिवंत काडतुसे, मॅगझिन (magazines) कुठे आणि कशासाठी घेऊन जात होता, असा सवाल उपस्थित झाला आहे. विमानतळ पोलिसांनी प्रवाशाला अटक केली असून, पुढील तपासासाठी पोलिस कोठडी घेतली आहे. मात्र, आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे

दीपक सीताराम काटे (वय ३२, रा. सराटी, इंदापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात इंडिगो विमान कंपनीच्या सुरक्षा अधिकारी प्रीती लक्ष्मण भोसले यांनी तक्रार दिली आहे. इंडिगो एअरलाइन्स कंपनीत तक्रारदार भोसले या सुरक्षा विभागात कार्यकारी सुरक्षा अधिकारी आहेत.

लोहगाव विमानतळावर (Lohgaon Airport) बुधवारी विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि सामानाची मशिनवर तपासणी करण्याची भोसले यांची ड्यूटी होती. प्रवासी दीपक काटे हा इंदापूर तालुक्यातील असून, व्यावसायिक आहे. लोहगाव विमानतळावरून इंडिगो विमानाने काटे हैदराबादला जाणार होता. विमानतळावर प्रवेश केल्यानंतर विमानात चढण्यापूर्वी प्रवाशांच्या बॅंगेची मशीनद्वारे तपासणी सुरू असताना काटे याच्या बॅगेत कडतूसं आणि मॅगझिन आढळून आली आहेत.

Deepak Kate
Satara Politic's : तुमची ती घोषणा दरोडा नव्हता का?; शिवेंद्रराजेंचा शशिकांत शिंदेंना सवाल

आता या प्रकरणामध्ये संभाजी ब्रिगेडने उडी घेतली असून दीपक काटे हा भाजपचा आणि संभाजी भिडे यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करत ही ओळख लपवली जात असल्याचे सांगितले आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे म्हणाले, विमानतळावर ज्या दीपक काटेला पोलिसांनी 28 काडतूसं बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे, तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. त्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंशी संबंध आहेत, असं दिसतंय. त्याच दीपक काटेचे संभाजी ऊर्फ मनोहर भिडे यांच्यासोबत सुद्धा थेट संबंध आहेत. परंतु ही संपूर्ण ओळख लपवली गेलेली आहे.

Deepak Kate
Ajit Pawar : अजितदादाचं पुन्हा वादग्रस्त विधान; ‘मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात’

या प्रकरणात पोलिस योग्य तपास करतील, असं वाटत नाही. कारण त्याची आणि त्याच्या पक्ष संघटनेची ओळख लपवली गेली आहे. कृपया पोलिसांना विनंती आहे की, त्याचा सोशल मीडिया चेक करावा. एवढी हत्यारं जर सापडली असतील तर फार मोठा घातपात करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रकरण गंभीर आहे. या सर्व प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी करावी, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी करण्यात येत आहे, असेही संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com