Ajit Pawar : अजितदादाचं पुन्हा वादग्रस्त विधान; ‘मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात’

Controversial Statement : उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. तालुक्यातील मेडद येथील पेट्रोल पंपाचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना अजितदादा हे नागरिकांवर चांगलेच संतापलेले दिसले.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Baramati, 06 January : उपमुख्यमंत्री अजित पवार हे रोखठोक आणि भाडभीड न ठेवता बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. स्पष्टवक्ते स्वभावामुळे ते स्वतः अनेकदा अडचणीत आहेत. विशेषतः त्यांचे होम ग्राउंड असलेल्या बारामतीत, इंदापूरमध्ये त्यांची कळी चांगलीच खुलते. अनेकदा भावनेच्या भरात ते बोलून जातात. मात्र, त्यामुळे त्यांच्या अडचणीत भरत पडते. अजितदादांनी बारामतीत केलेले असेच एक विधान त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. त्यावर आज दिवसभर चर्चा होताना दिसत आहे.

हिवाळी अधिवेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे परदेश दौऱ्यावर गेले होते. परदेश दौऱ्याहून आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक रविवारी ते बारामती आणि पुण्यात असतात. बारामती आणि इंदापूरमधील अनेक कार्यक्रमांत अजितदादांनी जोरदार फटकेबाजी केलेली आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांचीच अडचणी झालेली आहे. त्याचे प्रायश्चितही त्यांनी घेतलेले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी बारामतीच्या (Baramati) दौऱ्यावर होते. तालुक्यातील मेडद येथील पेट्रोल पंपाचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना अजितदादा हे नागरिकांवर चांगलेच संतापलेले दिसले. मात्र, त्यांच्या त्या विधानावर राज्यभरातून चांगलीच टीका होताना दिसत आहे.

Ajit Pawar
Santosh Deshmukh Murder Case : समाज आधीच अस्वस्थ; त्यात खासदारांबद्दल पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या टिपण्णीची भर...

मेडद येथील कार्यक्रमात बोलत असताना मधूनच नागरिक अजितदादांना निवेदन देत होते. सुरुवातीची एक दोन निवेदने त्यांनी स्वीकारली आणि त्यातील काम आपण मार्गी लावू, असे स्पष्ट करत होते. अधिकाऱ्यांनाही काही सूचनाही करत होते. मात्र, त्यानंतरही येणारे निवेदने पाहून अजितदादा चांगलचे चिडलल्याचे दिसून आले.

रविवारी बारामतीतील एका कार्यक्रमात निवेदन देणाऱ्या नागरिकावर अजितदादा संतापले. ‘तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाहीत झालात. का सालगडी कराल का मला?, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार हे नागरिकांवर संताप व्यक्त केला.

Ajit Pawar
Mahayuti News : ...तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू; महायुतीमधील बड्या नेत्याने दिला इशारा

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या विधानावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. हा मतदारांचा अपमान आहे. एवढं दिवस मतदारांमुळेच मला तुम्हाला सत्ता मिळाली. सगळं त्यांचच आहे. लोकांना उपाशी ठेवायचेही ते ठरवतील. लोकांनी मला एवढे दिवस मते दिली तर मी त्यांचा सालगडीच आहे, अशी भावनाही आव्हाड यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com