दिवंगत शिवसैनिक रुईकरांच अर्धवट राहिलेलं स्वप्न एकनाथ शिंदेंनी केले पूर्ण..

रुईकर यांच्या पत्नी कीर्ती रुईकर यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आभार मानले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना अचानक निधन झालेले कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर (Sumant Ruikar) यांचं अर्धवट राहिलेलं घराचं स्वप्न नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुढाकार घेऊन पूर्ण केले आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचे भूमीपूजन पार पडले. या भूमीपूजन सोहळ्याला व्हीसीद्वारे उपस्थित राहून शिंदे यांनी रुईकर कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना (Shivsena) ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले.

Eknath Shinde
नाना पटोलेंचे पुन्हा वाद्‌ग्रस्त विधान : ‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’!

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना लवकर बरं वाटावं तसेच, त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी पायी तिरुपती बालाजीला जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी पायी चालायला सुरुवात देखील केली. मात्र, रस्त्यात अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. २६ डिसेंबर रोजी कर्नाटक मधील रायचूर येथे उपचारादरम्यान त्यांचा दुःखद अंत झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे संपूर्ण कुटुंब निराधार झाले होते. ही बातमी समजल्यावर संवेदनशील मंत्री अशी ओळख असलेले शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत पाठवली होती. तसेच, ही मदत दिल्यावर फोन करून त्यांची विचारपूस देखील केली होती. मात्र, त्यानंतर आज एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी रुईकरांचे अर्धवट राहिलेल्या स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकले. आज (ता.23 जानेवारी) रुईकर यांच्या नवीन घराचं भूमिपूजन बीड येथे पार पडले.

शिंदे म्हणाले, "रुईकर यांचा मृत्यूची बातमी ही सगळ्यांसाठीच अतिशय वेदनादायी होती. या एका कट्टर शिवसैनिकाचा असा करूण अंत झाल्याचे पाहून माझे मन हेलावून गेले होते. मात्र, अशा या अवघड परिस्थितीत या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने मी घेतला. तसेच, बीडमधील शिवसेना कार्यकर्त्यांना निर्देश देऊन हे घर लवकरात लवकर बांधून देण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी या घराचे भूमीपूजन होत असल्याचा विशेष आनंद होत आहे" तसेच, सुमंत यांनी हे घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते, ते त्यांच्या संकल्पनेनुसार बांधून पूर्ण करणे हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी श्रद्धांजली ठरेल, असे शिंदेंनी सांगितले.

Eknath Shinde
आदित्य ठाकरेंचे मुंबईकरांना मोठे गिफ्ट; बाळासाहेबांच्या जयंतीदिनी केली घोषणा

रुईकर यांच्या पत्नी कीर्ती रुईकर यांनी शिंदे यांचे आभार मानले. पती गेल्यानंतर शिवसेनेने आपल्याला खंबीरपणे आधार दिला असून पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी केलेल्या मदतीबद्दल आपण पूर्ण समाधानी आहोत. आज माझे पती हयात नसले तरीही त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचा विशेष आनंद आम्हा रुईकर कुटुंबियांना आहे. हे घर बांधून पूर्ण झाल्यानंतर गृहप्रवेश करताना शिंदे साहेबानी नक्की बीडला यावे, असे निमंत्रण त्यांनी शिंदे यांना दिले. यावेळी रुईकर कुटुंब, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, स्थानिक शिवसैनिक बाजीराव चव्हाण, बीड जिल्ह्यातील समस्त शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com