Nagar Political News : रोहित पवारांच्या समर्थनार्थ जामखेड बंदची 'हाक'..!

Action on Yuva Sangharsh Yatra : युवा संघर्ष यात्रेवरील कारवाईवरुन राष्ट्रवादी संतप्त..
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे जिल्ह्यातून सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रेचा काल मंगळवारी नागपुरात समारोप झाला. यावेळी युवांच्या विविध प्रश्नांबाबतचे निवेदन देण्यास विधान भावनावर जाऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवत बळाचा वापर केल्याचा आरोप होत आहे.

पोलिसांनी यावेळी रोहित पवार Rohit Pawar यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सरकारची ही दडपशाही असून याचा निषेध म्हणून आता राष्ट्रवादी NCP काँग्रेस शरद पवार Sharad Pawar गट संतप्त झाला असून आज जामखेड बंदची हाक देण्यात आली आहे. काल सायंकाळी युवा संघर्ष यात्रेच्या झालेल्या समारोपाला शरद पवार, संजय राऊत आदी मविआ नेत्यांनी उपस्थिती लावली.

Rohit Pawar
Sachin Vaze News: शंभर कोटी खंडणी वसुली प्रकरणात मोठा ट्विस्ट; सचिन वाझेचा ईडीच्या भूमिकेवर आक्षेप ?

समारोपानंतर रोहित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी अचानक विधानभवनाकडे निघाले. त्यांच्या सोबत संघर्ष यात्रेतील शेकडो कार्यकर्तेपण निघाले.

पोलिसांनी रोहित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र निवेदन घेण्यास कोणी वरिष्ठ मंत्री न आल्याने संतप्त झालेले रोहित पवार आणि कार्यकर्ते यांनी बॅरिकेट्स बाजूला हटवत विधानभवनाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्ते आणि पोलिसांत संघर्ष झाला.

यावेळी पोलिसांनी रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राज्यातील अनेक जिल्ह्यातून युवा संघर्ष यात्रा Yuva Sangharsh Yatra 800 किलोमीटरचा प्रवास करून आली आहे. वाटेत आम्हांला अनेक ठिकाणी बेरोजगार युवा, शेतकरी, कामगार यांनी भेट घेत आपल्या अडचणींचे निवेदने दिलीत. युवांच्या बेरोजगारीचा आणि स्पर्धा परीक्षेत हजारो रुपये विनाकारण उकळल्याचा प्रश्न गंभीर आहे.

युवा, कामगार, शेतकरी यांचे समोर आलेले प्रश्न सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडण्यासाठी आम्हांला भेट घ्यायची होती, मात्र सरकारच्या आदेशाने पोलिसांनी दडपशाही केली असा आरोप यावेळी रोहित पवार यांनी निषेध केला. रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेवर विधानभवनात घडलेल्या प्रकारचा राष्ट्रवादी शरद पवार गटाने तीव्र निषेध केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारच्या या दडपशाहीचा निषेध म्हणून आज बुधवारी जामखेड Jamkhed बंदची हाक जामखेड राष्ट्रवादीने दिली आहे. नागपूर इथे घडलेल्या प्रकाराचा जामखेड राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, प्रकाश सदाफळ, विजय गोलेकर आदींनी निषेध करत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

( Edited by Amol Sutar )

Rohit Pawar
Jashraj Patil News: अपघातग्रस्त रिक्षा काढण्यासाठी आमदारपुत्र उतरले खड्ड्यात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com