Praniti Shinde News : प्रणिती शिंदेंनी केली सिव्हिलच्या मुद्द्यावरून आरोग्य विभागाची 'चिरफाड'..

Nagapur Winter Session : वाचला समस्यांचा पाढा ; विधानसभा अध्यक्षांनीही दिली साथ..
MLA Praniti Shinde
MLA Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

- आनंद सुरवसे

Praniti Shinde News : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोलापूर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे आक्रमक होऊन मतदारसंघातील प्रश्न मांडताना दिसून आल्या. बुधवारी त्यांनी सोलापूरमधील सिव्हिल रुग्णालयातल्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. तसेच रुग्णासाठी अतिरिक्त 100 खांटाचे रुग्णालय तत्काळ सुरू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी त्यांच्या प्रश्नावर राजकीय टीका करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी हस्तक्षेप केला आणि मंत्री महोदयांनी केवळ सभागृहातील सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याबाबत सूचना करत आमदार प्रणिती शिंदेंना साथ दिली. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आज सभागृहात आरोग्य विभागाशी निगडीत काही प्रश्न उपस्थित केले.

MLA Praniti Shinde
Ashok Chavan : ''नुकसान झाल्यानंतर 15 दिवसांनी केंद्रीय पथक येणार असेल, तर...'' ; अशोक चव्हाणांचं विधान!

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात (Nagapur Winter Session) त्यांनी सोलापूरसह राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयात लोह, विटॅमिनच्या गोळ्यांचा तुटवडा असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच गेल्या वर्षभरात आरोग्य मंत्रालयाकडून आणि राजकीय पक्षांकडून गावोगावी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्या शिबिराच्या माध्यमातून महिला रुग्णांना मोठ्या प्रमाणात लोह आणि इतर विटॅमिनच्या तसेच मधुमेहाच्या गोळ्यांचे वितरण केले जात आहे.

अशा शिबिरांमध्ये गरज नसलेल्या रुग्णांनाही गोळ्या वाटप झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. परिणामी सरकारी रुग्णालयांत गरोदर महिलांना देण्यासाठी गोळ्या उपलब्ध होत नाहीत, कारण त्याचे वाटप शिबीरामध्ये होत असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सीटीस्कॅन मशीन बंद आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोरगरीब रुग्ण येतात. तसेच आंध्र, कर्नाटक राज्यामधून येणाऱ्या रुग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

मात्र या ठिकाणी साधे सीटीस्कॅन मशीन उपलब्ध असून ते वापरात आणले जात नाही, मग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमके चाललेय, तुम्ही राज्यातील जनतेला व्हेटिलेटरवर ठेवले आहे का? गोळ्या नाहीत, सोयी सुविधा नाहीत, सीटी स्कॅन मशीन नाही, एमआरआय नाही मग आरोग्य कर्मचारी शिबीरात काम करण्यासाठीच उरलेत का? असा टोला त्यांनी यावेळी आरोग्य मंत्र्यांना लगावला.

याशिवाय सोलापूर सिव्हिल रुग्णालयाचा भार कमी करण्यासाठी स्वतंत्र 100 बेडचे महिला आणि बाल रुग्णालय बांधून तयार आहे. केवळ त्या ठिकाणी फर्निचरचे काम झाले नाही, म्हणून अद्यापही ते रुग्णालय सुरू करण्यात आले नाही. त्यासाठी किरकोळ निधीची आवश्यकता असून ते अद्याप सुरू केले नाही. ते तत्काळ सुरू करण्याची मागणी आमदार शिंदे यांनी केली आहे.

MLA Praniti Shinde
Parliament Attack : आठ दिवसांपूर्वी दिली होती संसदेवर हल्ल्याची धमकी ? पन्नूच्या 'त्या' व्हिडिओची चर्चा

आरोग्य सेवेच्या प्रश्नावर आक्रमकपणे भूमिका मांडताना टीकची झोड उठवल्याने मंत्री सावंत यांनी ही प्रत्युत्तर देताना शिंदे यांच्यावर निशाणा साधला. सावंत म्हणाले की, आरोग्य शिबीराचा मुद्दा उपस्थित केला त्याचा तुम्हाला त्रास होणे साहजिकच आहे. कारण आम्ही जनतेची सेवा करतोय. तसेच आम्ही शिबीरासाठी कोणत्याही सरकारी रुग्णालयातून गोळ्या औषधाचा वापर केला जात नाही.

शिबीरासाठी औषधांचा पुरवठा हा एनजीओकडून खरेदी केलेल्या औषधाच्या माध्यमातून केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आरोग्याच्या प्रश्नावर प्रणिती शिंदे यांनी आजपर्यंत मला एकही पत्र दिले नसल्याचा आरोपमंत्री सावंत यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अध्यक्ष नार्वेकरांचा हस्तक्षेप..

दरम्यान, मंत्री सावंत यांचे अनपेक्षित उत्तर येताच अध्यक्ष नार्वेकर यांनी हस्तक्षेप केला. मंत्री महोदयांनी साधारणपणे ज्या वेळेला सरकारकडून काम अपेक्षित असते तेव्हा केवळ विधानसभा सदस्यांनी पत्र दिले तरच काम करणं अपेक्षित नाही. हे सरकारचे काम आहे, सन्मानिय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण उचित कारवाई करावी, अशी सूचना नार्वेकर यांनी सावंत यांना केली. त्यानंतर सावंत यांनी शिंदेंच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.

(Edited by Amol Sutar)

MLA Praniti Shinde
NCP Nashik News : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी करणार सर्व्हेक्षण!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com