महेश साखर कारखान्याच्या वादावर माही आमदार Bhimrao Dhonde यांची Suresh Dhas यांना ताकीद | Ashti News

'तुम्ही आमदार-मंत्री झालात आमच्या घोषणेमुळे, फुग्यावाले समजू नका' - धोंडेंचा घणाघाती इशारा; महेश सहकारी कारखान्याच्या लायन्स रद्द प्रकरणात खळबळ

आष्टी विधानसभा मतदारसंघात महेश सहकारी साखर कारखान्याचे लायन्स रद्द झाले आहे, ते आमदार सुरेश धस यांनी रद्द करण्यासाठी पत्र दिले होते. असा आरोप माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केला होता. त्याला आमदार सुरेश धस यांनी प्रतिउत्तर दिले. यावेळी आमदार सुरेश धस यांनी आम्हाला दम देत आहेत, यावर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सुरेश धस यांच्यावर पुन्हा जोरदार टीका केली आहे.आमचे सुरेश धस यांच्यावर भरपूर उपकार आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी केले, आम्ही घोषणा दिल्या म्हणून तुम्ही आमदार, मंत्री झालात. उपकाराची फेड आपकारांनी करायची त्यांना सवय आहे. धमक्या देण बंद करावे. धमकीचा मी निषेध करतो, त्यांनी आमदारासारखे वागावे, त्यांनी आम्हाला फुग्यावाले सारख समजू नये, असे प्रत्युत्तर देत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सुरेश धस यांना इशारा देखील दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com